औद्योगिक उत्पादनाची सुमार कामगिरी

पीटीआय
शुक्रवार, 13 जुलै 2018

नवी दिल्ली - कारखाना उत्पादन आणि ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील सुमार कामगिरीचा फटका एकूण उत्पादनाला बसला आहे. मे महिन्यात औद्योगिक उत्पादनात केवळ ३.२ टक्के वृद्धी झाली असून, हा गेल्या सात महिन्यांतील नीचांकी दर आहे.

सांख्यिकी विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिल महिन्यातील सुधारित औद्योगिक उत्पादन निर्देशांक ४.८ टक्के होता, मात्र मे महिन्यात तो ३.२ टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. मे महिन्यात ऊर्जानिर्मिती, कारखाना उत्पादने आणि ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनात घसरण झाली. कारखाना उत्पादनात केवळ २.८ टक्के वाढ झाली तर वीजनिर्मिती ४.२ टक्‍क्‍यांनी घटल्याचे दिसून आले आहे. मे महिन्यात खनिज उत्पादनात ५.७ टक्‍क्‍यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.

Web Title: Poor performance of industrial production