पोस्टात दररोज २०० कोटींची उलाढाल

कैलास रेडीज
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

ठेवींमध्येही घसघशीत वाढ; खातेधारकांकडून गुंतवणूक योजनांना पसंती 

मुंबई - जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदली करण्याच्या मोहिमेत पोस्ट खात्यालाही चांगलाचा फायदा झाला आहे. गेल्या पाच दिवसांत पोस्टाची दररोजची उलाढाल २०० कोटींपर्यंत वाढली असून सरासरी ५० कोटींच्या नोटा बदली करण्यात येत आहेत. नोटा बदली करणाऱ्यांबरोबरच बचत खाते आणि इतर गुंतवणूक योजनांमध्ये जमा होणाऱ्या रकमेचा ओघदेखील वाढला आहे. 

देशात पोस्टाची ग्रामीण भागात चांगली पकड आहे. त्यामुळे गुरुवारपासून (ता.१०) मंगळवारपर्यंत (ता.१५) मुंबई विभागांतर्गत पोस्टाची दररोजची उलाढाल २०० कोटींच्या पुढे गेली आहे. महाराष्ट्र आणि गोव्यातील जवळपास २१०० पोस्ट कार्यालयांचा मुंबई विभागांतर्गत समावेश असून ५० हजारांहून अधिक ठिकाणी टपाल सेवा दिली जाते. पोस्टातील बचत खातेधारकांची संख्या लाखांच्या घरात आहे. त्यामुळे अनेकांनी नोटा बदली करण्याऐवजी त्या बचत खात्यात जमा करण्याचा पर्याय स्वीकारला आहे. 

याचसोबत रिकरिंग, पीपीएफ, मासिक बचत, सुकन्या समृद्धी, मुदत ठेवी परिणामी पोस्टातील खात्यांमध्ये मोठी रक्कम जमा होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, गर्दी कमी करण्यासाठी सकाळी आठ पासून नोटा बदलीसाठी येणाऱ्या नागरिकांना सर्वच पोस्ट कार्यालयात टोकन दिले जात आहे. मुख्य पोस्ट कार्यालयातून देखील दररोज अडीच ते तीन हजार टोकन दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. मुंबई विभागांतर्गत जवळपास ९० एटीएम असून, या ठिकाणी तुलनेने कमी गर्दी आहे. 

गोव्यात एका दिवशी ८० लाखांची उलाढाल 
गुरुनानक जयंतीनिमित्त सोमवारी महाराष्ट्रातील पोस्ट कार्यालयांना सुटी असली, तरी गोव्यात पोस्टाचे व्यवहार सुरू होते. गोव्यात सोमवारी एका दिवशी ८० लाखांची उलाढाल झाली. यात ६० लाखांची रोकड गोवेकरांनी बचत खात्यात जमा केली, तर २२ लाख ५० हजारांच्या जुन्या पाचशे आणि हजाराच्या नोटा बदलून घेतल्या.

Web Title: Post a turnover of Rs 200 per day