
Power of Investing: या छोट्या टिप्स तुम्हाला बनवतील करोडपती, वेळ कमी आहे Invest करायला लागा
Power of Investing: तुम्ही कमी वयात खूप काही मिळवलं आणि स्वत:साठी जगणं विसरलात तर तुमच्या त्या जगण्याला काही अर्थ आहे का, नाही अगदी तसच गुंतवणुकीचेही आहे. तुम्ही जेव्हा कधी गुंतवणुकीबाबत ऐकत असाल तेव्हा एक वाक्य नेहमी कानावर पडतं. ते म्हणजे कमी वयात केलेली गुंतवणूक तुम्हाला चांगले फायदे मिळवून देते.
अगदी हाच नियम तुम्हाला अनेक ठिकाणी लागू पडतो. बचत करण्यामुळे पैसा वाढण्यास पुरेसा वेळ मिळतो. तसेच तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये वैविध्य समाविष्ट केले पाहिजे. याशिवाय गुंतवणुकीचे चक्रही समजून घेतले पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मतही घेऊ शकता. (Investment Tips)
जर तुम्ही कमावते असाल तर गुंतवणुकीसाठी योग्य वयाची वाट पाहू नका. नोकरी सुरू करताच बचत सुरू करावी. उदाहरणार्थ, तुम्ही दरमहा 10,000 रुपये गुंतवायला सुरुवात केली आहे. ज्यावर तुम्हाला 12 टक्के परतावा मिळत आहे.
जर तुम्ही ही गुंतवणूक वयाच्या 25 व्या वर्षी सुरू केली, तर तुमच्या गुंतवणुकीची किंमत 60 वर्षांपर्यंत 6,43,09,595 रुपये होईल.तर, जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी ही गुंतवणूक सुरू केली, तर तुमची गुंतवणूक 3,49,595 रुपये होईल. 60 वर्षात 49,641 होईल.
पोर्टफोलिओमध्ये विविधता ठेवा
तुम्ही कोणत्याही एका गुंतवणुकीच्या साधनावर पूर्णपणे अवलंबून राहू नये. तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये नेहमी गुंतवणुकीची विविधता ठेवावी. उदाहरणार्थ, जर तुम्ही तरुण गुंतवणूकदार असाल तर तुम्ही पूर्णपणे इक्विटीमध्ये गुंतवणूक करू नये. तुम्ही कर्ज आणि सोन्यामध्ये गुंतवणूक करावी.
एक मालमत्ता वर्ग कधीही रिटर्न्स देत नाही
कधी शेअर बाजारात चांगले रिटर्न्स मिळतात तर कधी व्याजदर वाढल्यामुळे बँक एफडी सुद्धा चांगले रिटर्न्स देते. त्याच वेळी, कधीकधी गुंतवणूकदारांना रिअल इस्टेटमध्ये चांगल्या संधी मिळतात. या कारणास्तव गुंतवणूकदारांनी नेहमी गुंतवणूक चक्र समजून घेतले पाहिजे. यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराचा सल्लाही घेऊ शकता.