
बाजार सुरू होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?
मंगळवारी शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी वाढ दिसून आली. मेटल आणि आयटी शेअर्स मध्ये सर्वाधिक वाढ झाली. सेन्सेक्स 934.23 अंकांच्या म्हणजेच 1.81 टक्क्यांच्या वाढीसह 52,532.07 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 288.65 अंकांच्या म्हणजेच 1.88 टक्क्यांच्या वाढीसह 15638.80 वर बंद झाला.
भारतात विक्रीचे कोणतेही संकेत नसल्याने शिवाय वस्तूंच्या किमतीत घसरण झाल्यामुळे बाजारात रिकव्हरी झाल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. बाजाराने महागाई आणि कडक आर्थिक धोरणाशी संबंधित अनिश्चिततेवर मात केल्याचेही ही रिकव्हरी सांगते असे ते म्हणाले. पण बाजार अत्यंत संवेदनशील स्थितीत आहे. त्यामुळे अशा वेळी अगदी लहान नकारात्मक ट्रिगरही बाजारात उलथापालथ घडवून आणू शकतो.
हेही वाचा: क्रेडीट आणि डेबिट कार्डची माहिती सुरक्षित करण्यासाठी RBIची मार्गदर्शक तत्त्वे
आज कशी असेल बाजाराची स्थिती ?
मीडिया, पीएसयू बँक आणि मेटलमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आल्याचे रेलिगेअर ब्रोकिंगचे अजित मिश्रा म्हणाले. या तेजीमुळे दबाव काहीसा हलका झाला आहे. पण ही तेजी कितपत टिकते हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे. आता बाजाराचे लक्ष यूएस फेडच्या अध्यक्षांच्या भाषणाकडे आहे. जर निफ्टीने 15,700 ची लेव्हल ओलांडली तर तो 16,000 च्या दिशेने जाताना पाहू शकतो असेही ते म्हणाले.
हेही वाचा: टीसीएसच्या शेअर्समध्ये मिळेल तगडा परतावा, तुमच्याकडे आहे का ?
आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
टायटन (TITAN)
हिन्दाल्को (HINDALCO)
कोल इंडिया (COALINDIA)
जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)
टाटा मोटर्स (TATAMOTORS)
झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)
गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)
पर्सिस्टंट (PERSISTENT)
ऍस्ट्रल (ASTRAL)
टाटा पॉवर (TATAPOWER)
नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
Web Title: Pre Analysis Of Share Market 22 June 2022
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..