Share Market : आज कोणते 10 टॉप शेअर्स करतील परफॉर्म?

देशातील किरकोळ चलनवाढ कमी झाल्याने व्याजदरातील वाढ रोखण्याची अपेक्षा वाढल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले
Share Market
Share MarketEsakal

मंगळवार शेअर बाजारासाठी अतिशय चांगला ठरला. बाजार दिवसभरात उच्च पातळीवर बंद झाला. निफ्टी बँक मंगळवारीही विक्रमी पातळीवर बंद झाला. आयटी, ऑटो आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी झाली. (pre analysis of share market update 14 December 2022)

मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदी झाली. तर रियल्टी, तेल आणि वायू शेअर्समध्ये विक्री दिसून आली. सेन्सेक्स 403 अंकांनी वाढून 62533 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 111 अंकांनी वाढून 18608 वर बंद झाला.

निफ्टी बँक 238 अंकांनी वाढून 43947 वर बंद झाला. त्याचवेळी मिडकॅप निर्देशांक 176 अंकांनी वाढून 32667 च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्समध्ये खरेदी झाली. तर निफ्टीच्या 50 पैकी 34 शेअर्सनी तेजी नोंदवली. निफ्टी बँकेच्या 12 पैकी 11 शेअर्समध्ये खरेदी झाली.

Share Market
Share Market Opening: शेअर बाजारात सकारात्मकता; सेन्सेक्स 105 अंकांनी वधारला

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

देशातील किरकोळ चलनवाढ कमी झाल्याने व्याजदरातील वाढ रोखण्याची अपेक्षा वाढल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान म्हणाले. त्यामुळे मंगळवारी बाजारात शॉर्ट कव्हरिंग दिसून आले.

याशिवाय अमेरिकन बाजारातील वाढीमुळे बाजारातील उत्साहाला चालना मिळाली. बाजाराने मंगळवारी आपला 20-day SMA परत मिळवत त्याच्या वर बंद होण्यात यशस्वी झाला. जे एक चांगले लक्षण मानले जात आहे. बुलिश कँडल आणि डेली चार्टवर चांगली रिव्हर्सल फॉर्मेशन येत्या काळात बाजार तेजीत राहील हे सूचित करत आहे.

आपण लवकरच निफ्टी 18700-18725 च्या दिशेने जाताना पाहू शकतो. त्याच वेळी, खाली 18450 वर सपोर्ट आहे. हा सपोर्ट तुटल्यास निफ्टीत आणखी घसरण दिसून येईल.

Share Market
Stock Market : या स्टॉकने गुंतवणुकदारांना केले मालामाल, अडीच वर्षात तिप्पट परतावा...

निफ्टी शॉर्ट टर्म कंसोलिडेशनमधून बाउंसबॅक घेत आहे. 12 डिसेंबरला निफ्टीने 18350 च्या जवळ सपोर्ट घेतला. या प्रक्रियेत निफ्टीने फॉलिंग ट्रेंडलाइन ओलांडला आहे. मात्र, त्यानंतर ते अवरली अप्पर बोलिंजर बँडच्या जवळ येत असल्याचे दिसते.

निफ्टीची एकूण रचना सूचित करते की निफ्टी शॉर्ट टममध्ये18300-18650 च्या रेंजमध्ये कंसोलीडेशनचा साक्षीदार होऊ शकतो. दुसरीकडे, बँक निफ्टी 44000 च्या शॉर्ट टर्म टारगेटपासून फक्त दोन पावले दूर आहे. हे टारगेट गाठल्यानंतर निफ्टीमध्ये 44500 ची पातळी दिसू शकते.

Share Market
Share Market Closing : Sensex मध्ये 400 अंकाची तेजी, आयटी अन् बँकीग शेअर्समध्ये वाढ

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?

इंडसइंड बँक (INDUSINDBK)
बजाज फायनान्स (BAJFINANCE)
इन्फोसिस (INFY)
एचसीएल टेक (HCLTECH)
टीसीएस (TCS)
ऍस्ट्रल (ASTRAL)
भारत फोर्ज (BHARATFORG)
डिक्सन (DIXON)
बालक्रिष्ण इंडस्ट्रीज (BALKRISIND)
आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com