बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म?

चांगल्या जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत बाजारात तेजी दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले.
Share
ShareSakal

सोमवारी बाजारात सलग 6 दिवसांच्या घसरणीला अखेर ब्रेक लागला. आयटी, एफएमसीजी शेअर्समुळे शेअर बाजार सोमवारी हिरव्या रंगात बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 237.42 अंकांच्या म्हणजेच 0.46 टक्क्यांच्या वाढीसह 51597.84 वर बंद झाला. त्याच वेळी, 56.65 अंक म्हणजेच 0.37 टक्क्यांच्या वाढीसह तो 15350.15 च्या पातळीवर बंद झाला.

चांगल्या जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत बाजारात तेजी दिसून आल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे विनोद नायर म्हणाले. लार्ज कॅप शेअर्सने बाजाराला सपोर्ट मिळाला. दुसरीकडे, लघु-मध्यम शेअर्सवर दबाव होता. चलनवाढीचा दबाव आणि आर्थिक धोरणे कडक करण्याच्या शक्यतांमुळे बाजारावर दबाव राहिला.

Share
'या' मेटल स्टॉकमध्ये 600 रुपयांपेक्षा जास्त घसरण, गुंतवणुकदारांनी काय करावे?

आज कशी असेल शेअर बाजाराची स्थिती ?

निफ्टीला खालच्या बाजूला 15200 वर सपोर्ट दिसून येत आहे. तर वरच्या बाजूला 15450 रझिस्टंस दिसून येत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे कुणाल शाह म्हणाले. वर किंवा खाली येणारा कोणताही ब्रेक आऊट निफ्टीची दिशा ठरवेल असेही ते म्हणाले. निफ्टीने वरच्या बाजुला 15450 ची लेव्हल तोडली तर तो 15800 वर जाताना दिसू शकतो.

बँक निफ्टी अजूनही लोअर हाय आणि लोअर लो फॉर्मेशनसह डाऊनट्रेंडमध्ये आहे. डेली चार्टवर, यासाठी 33100 वर रझिस्टंस आहे. जर बँक निफ्टीने ही पातळी तोडली आणि त्याच्या वर गेली, तर आपण त्यात आणखी वाढ पाहू शकतो. खाली, बँक निफ्टीला 32,400 वर सपोर्ट दिसत आहे. जर हा सपोर्ट तुटला तर निफ्टीमध्ये अधिक विक्री दिसेल.

Share
22 लाख कोटी बुडाले; बिटकॉइन 20,000 डॉलरच्या खाली

निफ्टीने इंट्राडे चार्टवर डबल बॉटम फॉर्मेशन तयार केले आहे जे नजीकच्या कालावधीसाठी सकारात्मक आहे. याशिवाय, दैनंडेली दिन चार्टवर एक हॅमर रिव्हर्सल कँडल देखील तयार केली आहे जी नवीन पुलबॅक रॅलीची शक्यता दर्शवते. डे ट्रेडर्ससाठी 15250 वर सपोर्ट दिसत आहे. जर निफ्टी या पातळीच्या वर राहिली तर पुलबॅक रॅली चालू राहील आणि निफ्टी 15600 च्या दिशेने जाताना दिसेल. दुसरीकडे, जर तो 15250 च्या खाली घसरला तर तो 15180-15100 च्या दिशेने जाताना दिसतो.

Share
महत्त्वाची बातमी! ब्रोकरेज हाऊसनं LIC चे शेअर्स खरेदी करण्याचा दिला सल्ला

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते ?
एचडीएफसी (HDFC)

ब्रिटानिया (BRITANIA)

विप्रो (WIPRO)

एशियन पेन्ट्स (ASIANPAINTS)

ओएनजीसी (ONGC)

टाटा स्टील (TATASTEEL)

युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

हिन्दाल्को (HINDLACO)

इंडसइंड बँक (INDUSINDBANK)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com