घाऊक चलनवाढीचा चार वर्षांचा उच्चांक

घाऊक चलनवाढीचा चार वर्षांचा उच्चांक

नवी दिल्ली - घाऊक बाजारातील किमतींवर आधारित चलनवाढीचा दर जून महिन्यात ५.७७ टक्‍क्‍यांपर्यंत वाढला आहे. गेल्या चार वर्षांतील चलनवाढीचा हा उच्चांकी दर असून, इंधन आणि भाजीपाल्याच्या किमतींमध्ये झालेली प्रचंड वाढ चलनवाढीस कारणीभूत ठरली. 

रिझर्व्ह बॅंकेने चलनवाढीचे उद्दिष्ट चार टक्‍के निश्‍चित केले आहे. मात्र, जूनमधील घाऊक चलनवाढीने साडेपाच टक्‍क्‍यांवर झेप घेतल्याने आगामी पतधोरणात बॅंकेकडून व्याजदर वाढवले जाण्याची शक्‍यता व्यक्‍त करण्यात येत आहे. केंद्राच्या आकडेवारीनुसार, जूनमध्ये अन्नधान्यांच्या किमतींमध्ये १.८० टक्‍क्‍याची वाढ झाली. याच महिन्यात भाजीपाला तब्बल चारपटीने महागला. कांदे आणि बटाटेदेखील महाग झाले. बटाट्याच्या किमतींमध्ये ९९.०२ टक्‍क्‍यांची वाढ झाली; तर कांद्याचा दर १८.२५ टक्‍क्‍यांनी वाढला. डाळीच्या किमती मात्र २०.२३ टक्‍क्‍यांनी कमी झाल्या आहेत.

पुन्हा व्याजदरवाढ अटळ
रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची ३० जुलैपासून बैठक सुरू होणार आहे. सध्याचा चलनवाढीचा दर हा रिझर्व्ह बॅंकेच्या उद्दिष्टापेक्षा जास्त आहे. ऑक्‍टोबर ते मार्च या कालावधीसाठी ‘आरबीआय’ने चलनवाढीचे ४.७ टक्‍क्‍याचे सुधारित उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. सध्याची चलनवाढीची गती पाहता बॅंकेकडून पुन्हा एकदा व्याजदरवाढीचा झटका दिला जाण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com