अनुदानित गॅस सिलिंडर दोन रुपयांनी महागला

वृत्तसंस्था
बुधवार, 3 मे 2017

दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडर एलपीजीची किंमत 1.87 रुपयाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता एका 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 442.77 रुपयांवर पोचली आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात 2 रुपयांची, तर केरोसीनच्या दरात प्रतिलिटर 26 पैशांनी वाढ केली. सोमवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात आले आहेत.

केंद्र सरकार लवकरच पेट्रोलियम पदार्थांवर देण्यात येणारे अनुदान हटविण्याचा विचार करत आहे. 

सरकारी मालकीच्या तेल कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडर एलपीजीची किंमत 1.87 रुपयाने वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता एका 14.2 किलोच्या एलपीजी सिलिंडरची किंमत 442.77 रुपयांवर पोचली आहे. गेल्या महिन्यात 1 एप्रिल रोजी अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 5 रुपये 57 पैशांनी वाढवण्यात आली होती. 

अनुदानित केरोसीनची किंमत 0.26 पैशांनी वाढविण्यात आली होती. मुंबईत आता प्रतिलिटर केरोसीनचा दर 19.55 रुपये करण्यात आला आहे. केंद्र सरकारने दर महिन्याला केरोसीनवरील अनुदान कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. दर महिन्याला प्रतिलिटर 0.25 पैसे अनुदान कमी करण्यात येणार आहेत.

Web Title: price of Subsidized Gas cylinder increased by 2 Rs