खासगी पीएफ ट्रस्टला सामावून घेणार 

वृत्तसंस्था
सोमवार, 26 जून 2017

'ईपीएफओ'चे संकेत 

नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) सभासदांना मिळणाऱ्या सुविधा आणि लाभ खासगी पीएफ ट्रस्टमधील कर्मचाऱ्यांना मिळावा, या हेतूने देशभरातील सुमारे 500 खासगी पीएफ ट्रस्टना सामावून घेण्याचे संकेत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) दिले आहेत. 

देशात जवळपास एक हजार 550 खासगी पीएफ ट्रस्ट असून 82 लाख कर्मचारी या ट्रस्टचे सदस्य आहेत. सर्व ट्रस्टकडून जवळपास तीन लाख कोटींचा निधी हाताळला जातो. त्यापैकी एक कोटीपर्यंतचा निधी आणि 20 पेक्षा कमी सदस्य असलेल्या 500 ट्रस्टचे विलिनीकरण करण्याचा "ईपीएफओ'चा विचार आहे. त्यानुसार श्रम मंत्रालयाकडून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी कायदा 1952 मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी ईपीएफओ विश्‍वस्तांच्या बैठकीत या सुधारणेला मंजुरी दिली होती. छोट्या पीएफ ट्रस्टना सामावून घेतल्याने उर्वरित एक हजार बड्या ट्रस्टवर देखरेख ठेवणे सोपे जाईल, असे ईपीएफओचे म्हणणे आहे. ईपीएफओच्या साडेचार कोटी सदस्यांना विविध ऑनलाईन सेवा दिल्या जातात. विलिनीकरणामुळे छोट्या पीएफ ट्रस्टमधील सदस्यांनाही ईपीएफओचे ई-पासबुक, एसएमएस सुविधा तसेच ऑनलाईन दावे करण्याच्या सुविधा मिळणार आहेत; मात्र या विलिनीकरणामुळे कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर 0.65 टक्के प्रशासकीय शुल्क द्यावे लागणार आहे. 
 
Web Title: Private PF trust to accommodate