सेन्सेक्सला नफेखोरीचा फटका 

पीटीआय
गुरुवार, 26 एप्रिल 2018

मुंबई - जागतिक पातळीवरील घसरणीचे वातावरण आणि नफेखोरीचा फटका शेअर बाजाराला बुधवारी बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स ११५ अंशांची घसरण होऊन ३४ हजार ५०१ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३ अंशांची घट होऊन १० हजार ५७० अंशांवर बंद झाला. 

आशियाई आणि युरोपीय शेअर बाजारात बुधवारी घसरणीचे चित्र होते. याचबरोबर एप्रिलमधील वायदे व्यवहारांची पूर्तता उद्या होत असल्याने देशांतर्गत शेअर बाजारात अस्थिरता निर्माण झाली. सेन्सेक्‍समध्ये आज सकाळपासूनच घसरण होण्यास सुरवात झाली. अखेर कालच्या तुलनेत त्यात ११५ अंशांची घसरण होऊन तो ३४ हजार ५०१ अंशांवर बंद झाला. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा कायम असून, त्यांनी काल (ता.२४) ६८० कोटी रुपयांचे समभाग विकले. याचवेळी देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी ५०८ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले.

टाटा स्टीलमध्ये सर्वाधिक घसरण 
टाटा स्टीलच्या समभागात आज सर्वाधिक २.०१ टक्के घसरण झाली. त्याखालोखाल आयसीआयसीआय बॅंक १.८६ टक्के घसरण झाली. यानंतर ओएनजीसी १.७६, डॉ. रेड्डीज १.४६, इंड्‌स इंड बॅंक १.४४, मारुती सुझुकी १.४४, ॲक्‍सिस बॅंक १.३६, स्टेट बॅंक ऑफ इंडिया १.३३, एल ॲण्ड टी १.२८, एचडीएफसी बॅंक ०.९७, टाटा मोटर्स ०.८७ आणि हिरो मोटोकॉर्प ०.१८ टक्के घसरण झाली.

Web Title: Profit hit by the Sensex