सेन्सेक्‍सला नफेखोरीचा फटका

पीटीआय
गुरुवार, 27 सप्टेंबर 2018

मुंबई - अमेरिकेची मध्यवर्ती बॅंक ‘फेडरल रिझर्व्ह’च्या पतधोरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेअर बाजारात बुधवारी अस्थिरतेचे वारे निर्माण झाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १०९ अंशांच्या घसरणीसह ३६ हजार ५४२ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १३ अंशांची घसरण होऊन ११ हजार ५३ अंशांवर बंद झाला. 

सप्टेंबरच्या वायदेपूर्तीच्या पार्श्‍वभूमीवर गुंतवणूकदार सावध पवित्रा घेत आहेत. यातच ‘फेडरल रिझर्व्ह’च्या आगामी पतधोरण बैठकीकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. ‘फेडरल रिझर्व्ह’कडून व्याजदर वाढ होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. यामुळे आज शेअर बाजारात नफेखोरीचे वातावरण निर्माण झाले.

सेन्सेक्‍समध्ये आज ५८१ अंशांचे चढउतार झाले. सलग पाच सत्रांतील घसरणीनंतर काल (ता. २५) सेन्सेक्‍समध्ये वाढ झाली होती. परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्रीचा मारा कायम असल्याचा परिणाम आज झाला. दरम्यान, काल परकी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी १ हजार २३१ कोटी रुपयांचे समभाग विकले होते, तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी २ हजार २८४ कोटी रुपयांचे समभाग खरेदी केले होते.

विकासदर ७.३ टक्के राहील - एडीबी 
भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ चालू आर्थिक वर्षात चांगली होईल, असा अंदाज एशियन डेव्हलपमेंट बॅंकेने (एडीबी) आज व्यक्त केला. चालू आर्थिक वर्षात भारताचा विकासदर ७.३ टक्के राहील, अशी शक्‍यता बॅंकेने व्यक्त केली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Profit hit by the Sensex