शेअर बाजाराला नफेखोरीचा फटका

पीटीआय
बुधवार, 5 जून 2019

शेअर बाजाराला मंगळवारी नफेखोरीचा फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १८४ अंशांची घसरण होऊन ४० हजार ८३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ६६ अंशांची घट होऊन १२ हजार २१ अंशांवर बंद झाला.

सेन्सेक्‍समध्ये १८४ अंशांची घसरण; निफ्टीतही घट 
मुंबई - शेअर बाजाराला मंगळवारी नफेखोरीचा फटका बसला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स १८४ अंशांची घसरण होऊन ४० हजार ८३ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक ६६ अंशांची घट होऊन १२ हजार २१ अंशांवर बंद झाला. 

सेन्सेक्‍सच्या मंचावर हिरो मोटोकॉर्प, एचसीएल टेक, टीसीएस, एशियन पेंट्‌स, इंड्‌सइंड बॅंक आणि इन्फोसिस या कंपन्यांच्या समभागात ३.०८ टक्‍क्‍यांपर्यंत घसरण झाली. याच वेळी येस बॅंक, एनटीपीसी आणि ॲक्‍सिस बॅंक यांच्या समभागात आज २.७१ टक्‍क्‍यांपर्यंत वाढ झाली. वाहननिर्मिती आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांवर आज प्रामुख्याने विक्रीचा मारा राहिला. रिझर्व्ह बॅंकेकडून व्याजदर कपातीची शक्‍यता निर्माण झाल्याने काल (ता.४) या दोन्ही क्षेत्रांतील कंपन्यांचे समभाग वधारले होते. आज गुंतवणूकदारांनी या दोन्ही क्षेत्रांतील कंपन्यांच्या समभागांची विक्री करून नफेखोरीवर भर दिला. 

पूर्वमोसमी पावसाने यंदा अतिशय कमी हजेरी लावली आहे. यंदा मागील ६५ वर्षांतील सर्वांत कमी पूर्वमोसमी पाऊस पडल्याचा अहवाल जाहीर झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले. एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत पूर्वमोसमी पाऊस २५ टक्के कमी पडल्याचे समोर आले आहे. काल दोन्ही निर्देशांकांनी उच्चांकाला गवसणी घातली होती. यामुळे आज मोठ्या प्रमाणात नफेखोरी झाली, अशी माहिती विश्‍लेषकांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Profit hit by the stock market