प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 5 June 2019

दरवर्षी ‘आयटीआर’साठी ३१ जुलै अंतिम मुदत असते, मात्र यंदा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) कंपन्यांना उद्गम करकपातीची विवरणपत्रे भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना ‘फॉर्म-१६’ उपलब्ध करून देण्यासाठी १० जुलैपर्यंतचा अवधी दिला आहे.

नवी दिल्ली - प्राप्तिकर विवरणपत्र (आयटीआर) भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. 

दरवर्षी ‘आयटीआर’साठी ३१ जुलै अंतिम मुदत असते, मात्र यंदा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) कंपन्यांना उद्गम करकपातीची विवरणपत्रे भरण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांना ‘फॉर्म-१६’ उपलब्ध करून देण्यासाठी १० जुलैपर्यंतचा अवधी दिला आहे. यामुळे ३१ जुलैपर्यंत करदात्यांना विवरणपत्र भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहत असल्याने यास मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. गेल्या वर्षापासून अंतिम मुदतीनंतर विवरणपत्रे भरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Property Tax Statement