Car loan | जुन्यापुराण्या कारवरसुद्धा मिळते लोन, फायद्याचं की तोट्याचं जाणून घ्या pros and cons of taking loan against old car | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Car loan

Car loan: जुन्यापुराण्या कारवरसुद्धा मिळते लोन, फायद्याचं की तोट्याचं जाणून घ्या

मुंबई : स्वतःची कार खरेदी करणं हे अनेकांचे स्वप्न असतं. नवीन कार घेण्याचे बजेट नसलेले अनेक लोक वापरलेली कार खरेदी करून हे स्वप्न पूर्ण करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही जुनी कार घेण्यासाठी कर्जही घेऊ शकता.

कर्जाच्या मदतीने चांगली सेकंड हँड कार खरेदी करता येते. ही कर्जे आकर्षक व्याजदरावर उपलब्ध आहेत आणि त्यांची परतफेड कालावधी सात वर्षांपर्यंत आहे. काही ठिकाणी तर कारच्या मूल्याच्या १०० टक्क्यांपर्यंत कर्ज मिळतं. हेही वाचा - ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ !

देशात सध्या वर्षाला सुमारे ४० लाख जुन्या कार विक्री होतात.पाच वर्षांत ही संख्या दुप्पट होण्याचा अंदाज आहे. गाड्या विक्री होत आहेत म्हणजे त्यावर कर्जही असेल. बहुतांश बँका आणि बिगर बँकिंग फायनान्सिंग कंपन्या अशा कारसाठी कर्जही देतात.

सर्वच जुन्या कारवर मिळत नाही कर्ज...

सरकारी बँक ३ वर्षांपेक्षा जुनी नसलेल्या कारसाठीच कर्ज देतात. काही खासगी बँकांच्यो मते कर्ज चुकवेपर्यंत कार १० वर्षे जुनी होऊ नये. त्याशिवाय ग्राहकाची किमान मिळकत (जसे वार्षिक २.५ लाख) व वय २१-६५ वर्षे असायला हवे.

व्याजदर न्यू कार लोनपेक्षा अधिक असतो..

साधारणपणे यूज्ड कार लोनचा व्याजदर न्यू कार लोनपेक्षा अधिक असतो. बहुतांश बँका व एनबीएफसी जुन्या कारवर ३-५% जास्त दरावर कर्ज देतात. म्हणजे एक मोठी सरकारी बँक नव्या कारसाठी जेथे ८.४५% वर कर्ज देते तेथे कार जुनी असेल तर व्याज दर ११.०५-१४.५५% असेल.

वापरलेल्या कारसाठी किती कर्ज मिळतं ?

साधारणत: वापरलेल्या कारच्या किमतीच्या ७५% किंवा त्यापेक्षा कमी कर्ज मिळते. कर्ज किती द्यायचे हे बँकेवर अवलंबून आहे. काही प्रकरणात १००% फायनान्स शक्य आहे.

टॅग्स :carloans