बँकांचे खाजगीकरण करण्याची हीच योग्य वेळ: नंदन निलेकणी

वृत्तसंस्था
बुधवार, 21 मार्च 2018

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करण्याची हीच योग्य वेळ असून बँकाच्या आणि ग्राहकांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे असल्याचे मत इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि आधार कार्डचे प्रणेते नंदन निलेकणी यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई: सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खाजगीकरण करण्याची हीच योग्य वेळ असून बँकाच्या आणि ग्राहकांच्या दृष्टीने ते महत्त्वाचे असल्याचे मत इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि आधार कार्डचे प्रणेते नंदन निलेकणी यांनी व्यक्त केले आहे. पाच दशकांपूर्वी खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले त्यावेळेचा हेतू आता कालबाह्य झाला आहे. त्यामुळे सध्या बँकांचे खाजगीकरण करण्याची हीच योग्य वेळ आहे. 

सार्वजनिक बँकांचा एकूणच बँकिंग व्यवस्थेमध्ये मोठा वाटा असून तो खाजगीकरणाच्या स्पर्धेचा बळी ठरेपर्यंत वाट न पाहता त्यादृष्टीने आताच पाऊले उचलणे गरजेचे आहे. शिवाय ते करदात्यांच्या देखील हिताचे आहे.  बँकां सार्वत्रिक करण्यामागचा मूळ हेतू आता संपला आहे. खाजगीकरणाचा फायदा सांगताना निलेकणी यांनी दूरसंचार क्षेत्रातील खाजगीकरणाचा दाखल दिला. सध्या सार्वजनिक बँकांचा एकूण बँकिंग व्यवस्थेमध्ये 70 टक्के सहभाग आहे.  

Web Title: Public sector banks must be privatized: Nandan Nilekani

टॅग्स