संपामुळे बँकिंग सेवांवर परिणाम; ग्राहकांना मनस्ताप

वृत्तसंस्था
बुधवार, 26 डिसेंबर 2018

मुंबई: विजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदाच्या एकत्रीकरणाला विरोध म्हणून सार्वजनिक क्षेत्रातील बॅंक कर्मचारी आज, बुधवारी देखील संपावर गेल्याने बँकिंग व्यवस्था ठप्प झाली आहे. 21 डिसेंबर पासून सातत्याने संप, शनिवार -रविवारची सुट्टी आणि नाताळाची सुट्टी आल्याने बँकिंग सेवांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. विशेषतः बँकिंग सेवांसाठी सार्वजनिक बँकांवर अवलंबून असलेल्या ग्रामीण भारताला याचा मोठा फटका बसत आहे. 

विलीनीकरणाच्या विरोधात युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सच्या नैतृत्वाखालील नऊ संघटनांनी हा संप पुकारला आहे. याआधी अतिरिक्त मनुष्यबळ आयुक्ताबरोबर या संघटनांची झालेली बैठक निष्फळ ठरली आहे. बॅंकांचे विलीनीकरण करून प्रश्न सुटणार नाहीत, असे बॅंक कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भातही या संघटनांच्या मागण्या आहेत. आठवडाभराच्या आत बॅंकांचा हा दुसरा संप असणार आहे. 

युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्स ही बॅंक कर्मचारी संघटनांची प्रमुख संघटना आहे. या संघटनेअंतर्गत नऊ वेगवेगळ्या बॅंक संघटना येतात. सुमारे 10 लाख अधिकारी आणि कर्मचारी या संघटनेचे सदस्य आहेत. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Public Sector Banks On Strike Today, Services Affected