ऑनलाइन पॉलिसीत पुणे देशात नंबर एक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 सप्टेंबर 2018

पुणे - भारतीय आयुर्विमा महामंडळाचा (एलआयसी) मुदत विमा, पेन्शन पॉलिसी व आरोग्य विमा ऑनलाइन खरेदी करण्याकडे तरुणांचा कल वाढला आहे. गेल्या आर्थिक वर्षात ऑनलाइन पॉलिसी विक्रीमध्ये पुणे विभागाचा देशात प्रथम क्रमांक आला आहे. तसेच विम्याचा हप्ता डिजिटल पेमेंटने भरण्याचे प्रमाण ७० टक्के असल्याची माहिती एलआयसीचे पुणे विभागीय वरिष्ठ मंडल प्रबंधक बरुणकुमार खाँ यांनी शनिवारी दिली.

‘एलआयसी’च्या ६३व्या वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. मार्केटिंग व्यवस्थापक अरुण कुमार नंदा, विक्री व्यवस्थापक पी. के. बर्नवाल आदी उपस्थित होते. बरुणकुमार म्हणाले, ‘‘कॅशलेस इंडियाच्या धर्तीवर ‘यूपीआय’ आणि ‘भीम ॲप’द्वारे हप्ते भरण्याच्या सुविधेचा ७० टक्के ग्राहक वापर करतात, तर ३० टक्के लोक प्रत्यक्ष कार्यालयांमध्ये जाऊन हप्ता भरतात. तरुणांमध्ये ऑनलाइन पॉलिसी खरेदीचा कल वाढला आहे. 

एलआयसीचे देशात...
२९ कोटी पॉलिसीधारक 
२८ लाख कोटींहून अधिक मालमत्ता 
२५ लाख कोटींहून अधिक गंगाजळी 
विविध ठिकाणी ४ हजार ७०५ कार्यालये 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune is number one in online policy