होय, मी ट्विटर वापरत नाही! 

पीटीआय
शनिवार, 24 मार्च 2018

मोजक्‍या शब्दांत आणि अतिशय कमी वेळेत प्रतिसाद देण्याचे बंधन असल्यामुळे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी ट्विटरवर अकाउंट उघडलेले नाही.

कोची  : मोजक्‍या शब्दांत आणि अतिशय कमी वेळेत प्रतिसाद देण्याचे बंधन असल्यामुळे ख्यातनाम अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांनी ट्विटरवर अकाउंट उघडलेले नाही. खुद्द त्यांनीच याची येथे शुक्रवारी कबुली दिली. 

राजन हे सोशल मीडियावर सक्रिय नसल्याबद्दल त्यांना येथे एका कार्यक्रमात विचारणा करण्यात आली. यावर राजन म्हणाले, ""मला वेळ नाही. माझ्याकडे करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. एखाद्या गोष्टीत सहभागी व्हायचे म्हणजे त्यात सातत्य हवे. माझ्याकडे अतिशय जलद वेगाने विचार करून तुम्हाला 20 ते 30 सेकंदांत 140 अक्षरांमध्ये उत्तर देण्याची क्षमता नाही.'' 

Web Title: Raghuram Rajan Explains Why He Hasn't Joined Twitter Yet