'शिर्डी का चमत्कार' गोयलांच्या संपत्तीत 3 हजार पटींनी वाढ: राहुल

पीटीआय
बुधवार, 11 एप्रिल 2018

केंद्र सरकारचे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी स्वतःच्या मालकीच्या कंपन्यांना फायदा पोचवला असून गोयल कुटुंबीयांची मालकी असलेल्या कंपनीच्या नफ्यात तीन हजार पटींनी वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

नवी दिल्ली: केंद्र सरकारचे रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या समोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. गोयल यांनी स्वतःच्या मालकीच्या कंपन्यांना फायदा पोचवला असून गोयल कुटुंबीयांची मालकी असलेल्या कंपनीच्या नफ्यात तीन हजार पटींनी वाढ झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे गोयल यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली. 

काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा यांनी पत्रकार परिषदेत  पियूष गोयल यांच्यावर गंभीर आरोप केले. गोयल यांच्या पत्नी सीमा गोयल यांची मालकी असलेल्या इंटरकॉन एडव्हायजर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी २००५- ०६ मध्ये फक्त १ लाख रुपयांची गुंतवणूक करुन सुरु करण्यात आली. आता दहा वर्षांनी मात्र कंपनीचा नफा ३० कोटी रुपयांवर पोचला असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले. 

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी "शिरडी के चमत्कारों" की तो कोई "सीमा" ही नहीं है| '' असे ट्विट करत पियूष गोयल यांच्यावर टीका केली आहे. याशिवाय शिर्डी इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीच्या राकेश अग्रवाल आणि मुकेश बन्सल यांच्याशी देखील पियूष गोयल यांची जवळीक असून या दोघांनी बँकेचे ६५० कोटी रुपये थकवले असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.  मोदी सरकारकडून पारदर्शक सरकारचा दावा केला जातो आता मात्र त्यांचे सर्व दावे खोटे आणि दिखाव्यासाठी असून आता पोलखोल होत आहे, असेही काँग्रेसकडून सांगण्यात आले. 

 

Web Title: Rahul Gandhi targets Piyush Goyal for 'Shirdi ka Chamatkar'