रेल्वे तिकीट बुकिंग आता आणखी सोपे

वृत्तसंस्था
बुधवार, 14 जून 2017

नवी दिल्ली: एकेकाळी अतिशय किचकट काम असणाऱ्या रेल्वे तिकीटांच्या आरक्षणासाठी भारतीय रेल्वे विभागाने आणखी एक नवी सुविधा सादर केली आहे. तुमच्या स्मार्टफोनवरुन 'एमव्हिसा' या अॅप्लिकेशनवरुन रेल्वेचे तिकीट आरक्षित करता येणार आहे.

"भारतात स्मार्टफोनचा विस्तार लक्षात घेता आम्ही ही नवी तिकीट बुकिंग प्रणाली सादर केली आहे.", असे आयआरसीटीसीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए के मनोचा म्हणाले.

युझर्सना त्यांचे विसा कंपनीचे डेबिट, क्रेडिट किंवा प्रिपेड अकाऊंट एमव्हिसा अॅप्लिकेशनशी जोडावे लागेल. यानंतर क्यूआर कोड रेल्वेच्या वेबसाईटवर स्कॅन करुन सहजपणे तिकीट आरक्षित करता येईल. यासाठी आयआरसीटीसीने 4 सप्टेंबरपर्यंत प्रमोशनल ऑफर सादर केली आहे. या काळात एमविसाच्या अॅप्लिकेशनवरुन तिकीट आरक्षित करुन आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर पैसे भरणाऱ्यांना 50 रुपये कॅशबॅक दिला जाणार आहे.

दरम्यान, रेल्वे विभागाने 40,00 रेल्वेडब्यांचा कायापालट करण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत रेल्वेमध्ये अत्याधुनिक टॉयलेट्स, एलईडी लाईट्स, स्मोक डिटेक्शन सिस्टम बसविण्यात येणार आहेत.

Web Title: Railway ticket booking is now easier