एम. राजेश्वर राव RBI चे कार्यकारी संचालक

वृत्तसंस्था
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली- देशातील बँकांची शिखर बँक असलेल्या रिझर्व बँकेच्या संचालक मंडळातून जी. महालिंगम हे बाहेर पडल्याननंतर त्यांची जागा एम. राजेश्वर राव हे घेणार आहेत. रिझर्व बँकेने राव यांची नियुक्ती केली आहे. 

राजेश्वर राव हे कार्यकारी संचालक म्हणून सांख्यिकी व माहिती व्यवस्थापन विभाग, तसेच अर्थ बाजार विभाग आणि आंतरराष्ट्रीय विभागाची जबाबदारी सांभाळतील. राव हे अर्थशास्त्रातील पदवीधर असून, कोचीन विद्यापीठातून त्यांनी MBA केले आहे. इंडियन इंस्टिट्यूट ऑफ बँकर्सचे ते 'सर्टिफिकेटेड असोसिएट'देखील आहेत. 

राव हे 1984 मध्ये RBI मध्ये रुजू झाले. या मध्यवर्ती बँकेच्या विविध विभागांमध्ये त्यांनी वेळोवेळी कामाची जबाबदारी सांभाळली आहे. जोखीम पाहणी विभागाचे प्रमुखपदही त्यांनी यापूर्वी भूषविले आहे. तसेच, नवी दिल्लीसह अहमदाबाद, हैदराबाद, चेन्नई येथे त्यांनी प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पातळीवर बँकिंग तक्रारनिवारकाचे काम पाहिले आहे. 
 
Web Title: rajeshwar rao appointed as executive director at RBI