
भारतातील गुंतवणूक गुरू समजल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्यावर "इन्सायडर ट्रेडिंग'चा आरोप केला आहे. या प्रकरणी "सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया'ने (सेबी) गंभीर दखल घेत झुनझुनवाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे.
सेबीकडून "इन्सायडर ट्रेडिंग'चा आरोप
भारतातील गुंतवणूक गुरू समजल्या जाणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांच्यावर "इन्सायडर ट्रेडिंग'चा आरोप केला आहे. या प्रकरणी "सिक्युरिटीज एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया'ने (सेबी) गंभीर दखल घेत झुनझुनवाला आणि त्यांच्या कुटुंबीयांना चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. झुनझुनवाला यांनी केलेल्या गुंतवणुकीवर "सेबी'ने काही प्रश्न उपस्थित केले आहेत. झुनझुनवालांवरील आरोप सिद्ध झाल्यास सेबीकडून त्यांची बँक आणि डीमॅट खाती गोठवली जाण्याची शक्यता आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
ॲप्टेक कंपनीच्या शेअर खरेदी प्रकरणात झुनझुनवाला यांनी "इन्सायडर ट्रेडिंग'च्या माध्यमातून नफा मिळविल्याचा संशय सेबीने व्यक्त केला आहे. या प्रकरणाची जानेवारीपासून चौकशी सुरू आहे. झुनझुनवालांकडे ॲप्टेक कंपनीच्या व्यवस्थापनाचे अधिकार असल्याचे निदर्शनास आले आहे.
घसरणीनंतर शेअर बाजाराची सकारात्मक वाटचाल; सेन्सेक्समध्ये ३५९ अंशांची वाढ
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेबीने या प्रकरणी झुनझुनवाला यांच्यासह पत्नी रेखा, त्यांचा भाऊ राजेशकुमार आणि बहीण तसेच सासू यांची चौकशी केली आहे. मे 2016 ते ऑक्टोबर 2016 या कालावधीत ॲप्टेक कंपनीच्या शेअर खरेदी-विक्री व्यवहाराची सेबीने चौकशी केली आहे.
काय आहे प्रकरण?
झुनझुनवाला यांनी 2005 मध्ये ॲप्टेक कंपनीच्या शेअरची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. यात "इन्सायडर ट्रेडिंग' झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. वर्ष 2005 मध्ये झुनझुनवाला यांनी ॲप्टेक कंपनीचा शेअर 56 रुपयांना खरेदी केला होता. टप्याटप्याने कुटुंबियांच्या इतर सदस्यांनी देखील शेअर खरेदी केले.
लॉकडाऊनच्या काळात तुम्हीही काढू शकता तुमच्या पीएफ खात्यातील पैसे ! कसे ते घ्या जाणून...
झुनझुनवाला यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना ॲप्टेकच्या भविष्यातील योजना, आर्थिक स्थिती यासारख्या गोपनीय गोष्टींची आधीच माहिती होती. त्यावरून त्यांनी ट्रेडिंग करून जबरदस्त नफा कमावला असा ठपका सेबीने झुनझुनवाला कुटुंबियांवर ठेवला आहे. त्यातून कंपनीचे बाजारमूल्य 690 कोटी रुपये झाले. शिवाय कुटुंबियांकडे 49 टक्के हिस्सेदारी गेली.
परिणामी झुनझुनवाला यांना नियंत्रकाच्या पूर्वपरवागीशिवाय संचालकपद का बहाल केले, असा प्रश्न सेबीने ॲप्टेकच्या व्यवस्थापनाला विचारला आहे.