रतन टाटांच्या पाठीशी दोन कामगार संघटना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीआधी दोन कामगार संघटनांनी टाटा सन्सचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांना पाठिंबा दर्शविला आहे. या कामगार संघटनांचे सुमारे १६ हजार सदस्य आहेत. 

टाटा मोटर्सच्या संचालक मंडळाच्या महत्त्वाच्या बैठकीआधी दोन कामगार संघटनांनी टाटा सन्सचे हंगामी अध्यक्ष रतन टाटा यांना पाठिंबा दर्शविला आहे. या कामगार संघटनांचे सुमारे १६ हजार सदस्य आहेत. 

टाटा मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक ग्युंटर बुश्‍चेक यांना पुण्यातील टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनने पत्र पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे की, टाटा सन्स आणि टाटा समूहातील कंपन्यांच्या नेतृत्वामध्ये सुरू असलेले मतभेद चिंताजनक आहेत. या परिस्थितीत रतन टाटा नेतृत्वाबाबत जो निर्णय घेतील, त्याला आमचा पाठिंबा असेल. रतन टाटा यांच्या नेतृत्वाबद्दल आम्हाला आदर आहे. टाटा मोटर्सच्या जमशेदपूर येथील प्रकल्पातील टेल्को वर्कर्स युनियनहेही  टाटा यांना पाठिंबा दिला आहे. वेगाने वाटचाल करावयाची असल्यास सर्वांना एकत्रितपणे वाटचाल करावी लागेल, असे युनियनने म्हटले आहे.

Web Title: Ratan Tata's two trade union support