केवायसी खातेधारकांना पैसे भरण्यावर नाही बंधन

वृत्तसंस्था
बुधवार, 21 डिसेंबर 2016

सिटिझन जर्नालिस्ट बनू या
'ई सकाळ'च्या नव्या रचनेत वाचकांच्या मतांना, विचारांना सर्वोच्च प्राधान्य आहे. 
आपण ई सकाळमध्ये सहभागी होऊ शकताः

  • 'सकाळ संवाद'द्वारेः अॅन्ड्रॉईड अॅप डाऊनलोड करा आणि पाठवा बातम्या, लेख, फोटो, व्हिडिओ आणि ऑडिओ. 
  • ई मेलद्वारेः आपले सविस्तर मत ई मेल करा webeditor@esakal.com आणि Subject मध्ये लिहाः CitizenJournalist
  • प्रतिक्रियांद्वारेः व्यक्त व्हा बातम्यांवर, प्रतिक्रियांवर

मुंबई - रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीसंदर्भातील नियमांमध्ये पुन्हा एकदा बदल करीत केवायसी नियमांची पुर्तता करणाऱ्या खातेधारकांना 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा भरण्यासाठी कोणतेही बंधन नसल्याचे स्पष्ट केले आहे.

काळा पैसाधारकांना गोत्यात आणण्यासाठी येत्या 30 डिसेंबरपर्यंत नागरिकांना फक्त एकदाच जुन्या नोटांच्या स्वरुपात पाच हजारांपेक्षा अधिकची रोख बँकेत जमा करता येईल असे रिझर्व्ह बँकेने यापूर्वी म्हटले होते. परंतु आता हा नियम केवायसी नियमांची पुर्तता न केलेल्या खात्यांसाठी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. केवायसी नियमांची पूर्तता करणाऱ्यांना कितीही पैसे भरता येऊ शकणार आहेत. 

पाच हजारांपेक्षा अधिक रक्कम जमा करावयाची झाल्यास खातेधारकाला बँक अधिकाऱ्यांच्या चौकशीला सामोरे जावे लागणार, असेही आरबीआयने म्हटले होते. आता केवायसी पूर्तता करणाऱ्यांना दिलासा देण्यात आला आहे. नव्या नोटांसाठी मात्र हा नियम लागू असणार नाही.

Web Title: RBI exempts all KYC accounts from Rs 5000 deposit norms