पीएमसी बँक गैरव्यवहाराबद्दल आरबीआय गर्व्हनर म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

- भारतीय बँकिंग व्यवस्था ही सुदृढ आणि स्थिर असल्याचे प्रतिपादन केले आहे.

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांता दास यांनी भारतीय बँकिंग व्यवस्था ही सुदृढ आणि स्थिर असल्याचे प्रतिपादन केले आहे. एका सहकारी बँकेच्या (पीएमसी बॅंक प्रकरण) प्रकरणावरून सर्व बॅंकिंग व्यवस्थेचे चित्र उभे राहत नाही. सर्वसामान्य नागरिक आणि गुंतवणूकदार यांना त्यांनी अफवांकडे दुर्लक्ष करण्यास सांगितले आहे.

पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेवरील आरबीआयच्या कारवाईचे समर्थन करताना दास म्हणाले, की रिझर्व्ह बॅंकेने वेगाने कारवाई केली. आम्ही तिथे प्रशासकाची नियुक्ती केली, पीएमसी बॅंकेच्या रोकडचे पुनरावलोकन केले, आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली. मात्र, या एका प्रकरणावरून सहकारी बँकांच्या स्थितीविषयी एक सर्वसाधारण मत बनवणे योग्य ठरणार नाही. दास पुढे म्हणाले, की आरबीआय सहकारी बॅंकांच्यासंदर्भात नियमांचा आढावा घेणार असून, प्रसंगी सरकारशी त्याबाबतीत चर्चा करणार आहे.

अनिल अंबानी डिसेंबरपर्यंत बंद करणार दोन कंपन्या

23 सप्टेंबरला आरबीआयने पीएमसी बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. यात आधी खातेदारांना काढून घेता येणाऱ्या पैशांची कमाल मर्यादा 1,000 रुपये ठेवण्यात आली होती. नतंर आरबीआयने ही मर्यादी वाढवून 10,000 रुपये आणि त्यानंतर 25,000 रुपयांवर नेली आहे. आरबीआयने बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे आणि जय भगवान भोरिया यांची पीएमसी बॅंकेचे प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

Vidhan Sabha 2019 : बघताय काय रागानं? TikTok स्टारला तिकीट दिलंय भाजपनं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI Governor Shaktikanta Das says on PMC Bank Scam