RBI Monetary Policy April 2022: रेपो रेट स्थिरच; सलग अकराव्यांदा कसलाही बदल नाही

Shaktikant-Das
Shaktikant-Das

RBI Monetary Policy April 2022 Announcement: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) गव्हर्नर शक्तींकात दास (Governor Shaktikanta Das) आज द्वैमासिक मौद्रिक धोरणांच्या (RBI MPC) निर्णयांची घोषणा करत आहेत. सातत्याने वाढत असलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर आरबीआयच्या समोर अनेक आव्हाने आहेत. सलग ११ व्या वेळी भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या दरांमध्ये बदल केला नाहीये.

Shaktikant-Das
नाना पटोले शरद पवारांच्या भेटीला, 'त्या' बैठकीनंतर राज्यात घडामोडींना वेग

पुन्हा एकदा रेपो रेट स्थिर

भारतीय रिझर्व्ह बँकेने पुन्हा एकदा केंद्रीय बँकेच्या दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाहीये. रेपो रेट (Repo Rate) ४ टक्क्यांवर स्थिर आहे. ज्या दरावर केंद्रीय बँक इतर बँकेकडून कर्ज घेते, त्याला रेपो रेट असं म्हणतात. रेपो रेट वाढल्याने ग्राहकांवर ईएमआयचा बोझा वाढतो.

रिव्हर्स रेपो रेट देखील स्थिरच

भारतीय रिझर्व्ह बँकेने रिव्हर्स रेपो रेटमध्ये (Reverse Repo Rate) देखील कसलेही बदल केलेले नाहीयेत. हाह दर ३.३५ टक्क्यांवर स्थिर आहे. यासोबतच मार्जिनल स्टँडींग फॅसिलीट (MSF) आणि बँक रेट देखील ४.२५ वरच स्थिर आहेत.

Shaktikant-Das
नाना पटोले शरद पवारांच्या भेटीला, 'त्या' बैठकीनंतर राज्यात घडामोडींना वेग

वाढीवर रिझर्व्ह बँकेचं अनुमान

रिझर्व्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी जीडीपीचा (GDP) अंदाज बांधला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटलंय की, चालू आर्थिक वर्षामध्ये हा दर ७.२ टक्क्यांवर राहू शकतो. पहिल्या तिमाहीमध्ये हा दर १६.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीमध्ये ६.२ टक्के तर तिसऱ्या तिमाहीसाठी वास्तविक जीडीपी ४.१ टक्के आणि चौख्या तिमाहीमध्ये हा दर ४ टक्के असू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com