ऊर्जित पटेल यांना घसघशीत वेतनवाढ

वृत्तसंस्था
सोमवार, 3 एप्रिल 2017

आरबीआय धोरणकर्त्यांना घसघशीत वेतनवाढ

मुंबई/नवी दिल्ली: नोटाबंदीच्या काळात टीकेच्या धनी बनलेले रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ.उर्जित पटेल यांना घसघशीत वेतनवाढ मिळाली आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावानुसार गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांची वेतनश्रेणी सुधारीत केली आहे. त्यानुसार पटेल यांना मूळवेतनापोटी अडीच लाख आणि इतर भत्तेमिळून दरमहा तब्बल 3 लाख 70 हजार रुपयांचे वेतन मिळणार आहे. सुधारीत वेतनश्रेणीचा लाभ माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनाही होणार असून भरघोस वेतन थकबाकी मिळणार आहे.

गव्हर्नरांच्या वेतनाबाबत रिझर्व्ह बॅंकेने वेबसाईटवर माहिती जाहीर केली आहे. 30 नोव्हेंबर 2016 रोजी पटेल यांना एकूण 2 लाख 9 हजार 500 रुपयांचे मानधन होते. यात मूळ वेतन, महागाई भत्ता आणि इतर भत्त्यांचा समावेश असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. दरम्यान गव्हर्नर आणि डेप्युटी गव्हर्नर यांच्या वेतनश्रेणीबाबत माहिती अधिकारात विचारले असता त्यांची वेतनश्रेणी सुधारीत केल्याचे बॅंकेने म्हटले आहे. सुधारीत वेतनश्रेणीनुसार गव्हर्नरांचे मूळ वेतन 90 हजारांवरून थेट अडीच लाखांपर्यंत वाढले आहे. त्याशिवाय डेप्युटी गव्हर्नरांचे मूळ वेतन 80 हजारांवरून 2 लाख 25 हजारांपर्यंत वाढले आहे. सुधारीत वेतनश्रेणी 1 जानेवारी 2016 पासून लागू झाल्याचे बॅंकेने म्हटले आहे. त्यामुळे पटेल यांच्याबरोबरच आर.गांधी, एस. एस. मुंढ्रा, एन. एस. विश्‍वनाथन आणि विरल आचार्य या चार डेप्युटी गव्हर्नरांना फायदा झाला आहे. दरम्यान सरकारने गव्हर्नरांची वेतनश्रेणी सुधारीत केली असली तरी इतर बॅंकांमधील उच्चपदस्थांच्या तुलनेत ती कमीच आहे.

माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या वेतनश्रेणीत चारवेळा सुधारणा करण्यात आली होती. राजन यांना सुरूवातीला 1 लाख 69 हजारांचे मानधन होते. पदमुक्‍त होताना ते 2 लाख 9 हजारांपर्यंत वाढले होते.

Web Title: RBI Governor Urjit Patel and his deputies get huge pay hike