रिझर्व्ह बँकेकडून दरवाढ

कैलास रेडीज
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

मुंबई: किरकोळ तसेच घाऊक चलनवाढीला नियंत्रणात ठेवण्याच्यादृष्टीने रिझर्व्ह बॅंकेनेे सलग दुसऱ्या पतधोरणात व्याजदर वाढीचा दणका दिला. बुधवारी (ता.1) बॅंकेने रेपो दरात पाव टक्‍क्‍याची वाढ करत तो 6.50 टक्के केला आहे. यामुळे बॅंकांनी कर्जदरात वाढ करावी लागणार असून गृहकर्ज, वाहन कर्ज तसेच ग्राहकोपयोगी वस्तूंसाठी कर्जे महागणार आहेत. ऑक्‍टोबर 2013 नंतर प्रथमच सलग दोन पतधोरणात "आरबीआय"ने व्याजदर वाढ केली आहे. खरिपासाठी सरकारने किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढल्यामुळे चलनवाढीचा दर अर्धा टक्‍क्‍याने वाढण्याची शक्‍यता आहे. 

मुंबईतील मुख्यालयात रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण समितीची तीन दिवसीय बैठक "आरबीआय" गव्हर्नर डॉ.ऊर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  जागतिक बाजारात खनिज तेलातील किंमती कमी झाल्या आहेत. मात्र याच कालावधीत रुपयाचे अवमूल्यन डोकेदुखी ठरणार आहे.  

Web Title: RBI hikes repo rate by 25 bps to 6.50 pct.