रिझर्व्ह बँकेकडून 'या' तीन बँकांवर दंडात्मक कारवाई 

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पंजाब- महाराष्ट्र बँकेनंतर आता महाराष्ट्रातील आणखी दोन सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

"मुंबई - रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) पंजाब- महाराष्ट्र बँकेनंतर आता महाराष्ट्रातील आणखी दोन सहकारी बँकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. नियमांचा भंग केल्याप्रकरणी आरबीआयने पुण्यातील जनता सहकारी बँक आणि जळगावमधील जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँक या बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. नियमांचा भंग केल्याचा ठपका ठेवत पुण्यातील जनता सहकारी बँकेला एक कोटी रुपयांचा केला आहे. तर जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकेला 25 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.  याचबरोबर ऑगस्ट 2015 पासून पूर्ण क्षमतेने कामकाजाला सुरुवात करणाऱ्या बंधन बँकेने प्रवर्तक हिस्सेदारी 40 टक्क्यांवर न आणल्याबद्दल आरबीआयने एक कोटी रुपयाचा दंड केला आहे. 

 जनता सहकारी बँक आणि जळगाव पीपल्स को-ऑपरेटिव्ह बँकांवर मालमत्ता वर्गीकरण (आयआरएसी) निकष, एक्सपोजर मानदंड आणि वैधानिक / इतर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ठपका रिझर्व्ह बँकेने ठेवला आहे. नियमांचे पालन न केल्याप्रकरणी आरबीआयच्या बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 तरतुदींनुसार हा दंड आकारण्यात आला आहे, असे बँकेने नमूद केले आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI imposes penalty on Janata Sahakari Bank, Jalgaon Peoples Co-operative Bank