रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर ‘जैसे थे’

वृत्तसंस्था
बुधवार, 7 डिसेंबर 2016

मुंबई : रिझर्व्ह बॅंकेकडून रेपो दर 'जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेत 6.25 टक्‍क्‍यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्क्यांवर, तर बँक रेट 6.75 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

पाचशे व हजारच्या नोटा रद्द केल्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने आज (बुधवार) पहिला पतधोरण आढावा जाहीर केला. 
नोटाबंदीनंतर बॅंकांतील ठेवींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्यामुळे सर्व स्तरातून रेपो दरात आरबीआय कपात करेल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, तसे झालेले नाही. 

बॅंकांमध्ये ठेवी वाढल्याने रिझर्व्ह बॅंकेने 28 नोव्हेंबर सीआरआर तात्पुरत्या स्वरूपात शंभर टक्‍क्‍यांवर नेला होता. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांनी पहिल्या पतधोरण आढाव्यात रेपो दरात 0.25 टक्के कपात करून तो 6.25 टक्‍क्‍यांवर आणला होता. पतधोरण समितीच्या शिफारशीवर आधारित आजचे हे दुसरे पतधोरण होते. जानेवारी 2015 पासून रिझर्व्ह बॅंकेने रेपोदरात 1.75 टक्के कपात केली आहे.

यंदाच्या आर्थिक वर्षातील हे पाचवे द्वैमासिक पतधोरण आहे. राजन यांच्या काळात शेवटची रेपो दर कपात एप्रिलच्या पतधोरणात झाली. या आर्थिक वर्षांत एप्रिल महिन्यात पाव टक्क्य़ांची कपात केल्यानंतर जून व ऑगस्टच्या दोन पतधोरणांत रेपो दर कपात करण्यात आली नव्हती.
गेल्या पतधोरण आढाव्यापासून सरकारने सहा सदस्यांची नियुक्ती केली असून तिचे अध्यक्षपद गव्हर्नरांकडे देण्यात आले आहे. असे असले तरी व्याजदराबाबत समितीतील गव्हर्नर वगळता अन्य पाच सदस्यांना निर्णय अधिकार आहेत. गव्हर्नरांना केवळ अधिक मतांच्या बाजुनेच कौल द्यावयाचा आहे.
 
Web Title: RBI keeps repo rate as it is