रिझर्व्ह बँक पुन्हा दर कपात करणार?; नवीन घोषणेकडे सर्वांचे लक्ष 

टीम ईसकाळ
Tuesday, 1 October 2019

रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण आढावा समिती मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्याजदरात कपात करण्याची अपेक्षा व्यक्त होते आहे.

मुंबई: रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरण आढावा बैठकीला आज (1 ऑक्टोबर) सुरूवात झाली. रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांच्या अध्यक्षतेखालील पतधोरण आढावा समिती मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी व्याजदरात कपात करण्याची अपेक्षा व्यक्त होते आहे. आर्थिक आघाडीवर मर्यादीत पर्याय उपलब्ध असून पतधोरण आढाव्यातच काही पावले उचलता येतील असे संकेत आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी यासंदर्भात याआधीच दिले आहेत.

 सरकारने याआधीच कॉर्पोरेट करातील कपात, परकी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांवर लावलेला अधिभार रद्द करणे यासारखी पावले उचलली आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच अर्थव्यवस्थेचा विकासदर सहा वर्षांच्या निचांकीवर म्हणजे 5 टक्क्यांपर्यत खाली आहे. सहा सदस्यीय पतधोरण समितीच्या 2019-20 या आर्थिक वर्षासाठीच्या चौथी द्विमासिक बैठकीतील निर्णयांची घोषणा शुक्रवारी 4 ऑक्टोबरला होण्याची शक्यता आहे. 2 ऑक्टोबर राष्ट्रीय सुटी असल्यामुळे समितीची बैठक होणार नाही. रिझर्व्ह बॅंकेने यावर्षी आतापर्यत सलग चार वेळा रेपोरेट मध्ये एकूण 110 बेसिस पॉईंटची कपात केली आहे.

एनबीएफसी क्षेत्रातील रोकडच्या उपलब्धतेच्या संदर्भात पावले उचलण्यात आल्यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रालासुद्धा रिझर्व्ह बॅंकेकडून पावले उचलली जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI may lend a helping hand to govt, cut policy rates by 25 bps