RBIने खरेदी केलं तब्बल 65 टन सोनं; जाणून घ्या कारण

भारतीय रिझर्व्ह बँकेने 2022 च्या आर्थिक वर्षात सुमारे 65 टन सोने खरेदी केले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे.
RBI - Gold Stock
RBI - Gold Stockesakal

भारतात सोने खरेदी कायमच सुरक्षित गुंतवणुकीच्या दृष्टीकोनातून केली जाते. अशातच भारतीय रिझर्व्ह बँकेने 2022 च्या आर्थिक वर्षात सुमारे 65 टन सोने खरेदी केले आहे, जे मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. त्यामुळे आरबीआयकडे सोन्याचा साठा आता 760.42 टन झाला आहे. अलीकडील जागतिक आर्थिक अस्थिरतेच्या काळात सुरक्षित गुंतवणूक म्हणून RBI ने सोने खरेदी वाढवली आहे. इकॉनॉमिक टाईम्सच्या वृत्तानुसार, आरबीआयने जून 2020 ते मार्च 2021 या 9 महिन्यांत 33.9 टन सोने खरेदी केले होते. आर्थिक वर्ष 2022 मध्ये आरबीआयच्या सोन्याची रिझर्व्ह व्हॅल्यू 30 टक्क्यांनी वाढ होऊन 3.22 लाख कोटी रुपये झाली आहे.

RBI - Gold Stock
'या' शेअरचा एका वर्षात 200 टक्के परतावा, आता खरेदी करणं फायद्याचं ठरेल का?

यापैकी 1.25 लाख कोटी रुपयांचे सोने आरबीआयच्या इश्यू डिपार्टमेंटकडे मालमत्ता (Asset) म्हणून ठेवले आहे. तर, बाकी 1.97 लाख कोटी रुपयांचे सोने (गोल्ड डिपॉझिट सहित) आरबीआयच्या बँकिंग डिपार्टमेंटकडे मालमत्ता (Asset) म्हणून ठेवले आहे.

सोन्याची खरेदी, सोन्याच्या किमतीत झालेली वाढ आणि आर्थिक वर्षात डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन यामुळे त्यांच्या सोन्याच्या रिझर्व्हचे मूल्य 30 टक्क्यांनी वाढल्याचे आरबीआयने आपल्या वार्षिक अहवालात म्हटले आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात सोने हा पुन्हा एकदा गुंतवणुकीसाठी सुरक्षित पर्याय असल्याचे सिद्ध झाल्याचेही यात म्हटले आहे.

RBI - Gold Stock
या स्मॉलकॅप स्टॉकचा 1 वर्षात 1846% परतावा, रेकॉर्ड डेटपूर्वी अपर सर्किटला धडक

मार्च महिन्याच्या अखेरीस, आरबीआयकडे एकूण 760.42 मेट्रिक टन सोने होते. यापैकी 11.08 मेट्रिक टन सोन्याच्या ठेवींमध्ये समाविष्ट आहे. एकूण सोन्याच्या साठ्यापैकी 453.52 मेट्रिक टन सोने परदेशात - बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्समध्ये (BIS) ठेवले आहे. तर बाकी 295.82 मेट्रिक टन सोने भारतात आहे. देशाच्या एकूण परकीय चलनाच्या साठ्यात (Foreign Exchange Reserve) सोन्याची हिस्सेदारी 7 टक्क्यांवर पोहोचली आहे, जी सहा महिन्यांपूर्वी 5.88 टक्के होती.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com