पंजाब अँण्ड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बॅंकेवर रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध

सकाळ न्यूज नेटवर्क 
Tuesday, 24 September 2019

रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेवर "प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन" घेतली असून यापुढे बॅंकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारता येणार नाहीत. त्याशिवाय खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. ​

मुंबई : आर्थिक अनियमितता आढळून आल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने सहकार क्षेत्रातील पंजाब अँड महाराष्ट्र को ऑपरेटिव्ह बॅंकेवर सहा महिन्यांसाठीस निर्बंध लादले आहेत.

रिझर्व्ह बॅंकेने बॅंकेवर "प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन" घेतली असून यापुढे बॅंकेला कर्ज वितरण, ठेवी स्वीकारता येणार नाहीत. त्याशिवाय खातेदारांना केवळ एक हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयानंतर  बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांनी खातेदारांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.  

#HowDareYou 16 वर्षीय ग्रेटा जगातील नेत्यांवर संतापली, म्हणाली....

"आरबीआय"ने पंजाब अँड महाराष्ट्र बॅंकेवर कलम 35 ए अंतर्गत "प्रॉम्प्ट करेक्‍टीव्ह ऍक्‍शन" घेतली आहे. 23 सप्टेंबर पासून निर्बंध लागू झाल्याची अधिसूचना आरबीआयने प्रसिद्ध केली आहे. ज्यामुळे बँकेच्या खातेदारांना 'आरबीआय'च्या निर्देशानुसार बँक खात्यातून मर्यादित रक्कम काढता येते. अनियमितता दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असून पुढील सहा महिन्यात त्यात यश येईल असे थॉमस यांनी म्हटले आहे.

थरूरजी, या इंडिया गांधी कोण?; नेटिझन्सकडून ट्रोल


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI put restriction PMC bank for transactions