उमेदवारांसाठी रोखीची मर्यादा वाढवण्यास RBIचा नकार

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

मुंबई : पाच राज्यांमध्ये सार्वत्रिक निवडणूक लढवत असलेल्या उमेदवारांसाठी नोटाबंदीनंतर एटीएम व बँकेतून रोख रक्कम काढण्यावर घालण्यात आलेली मर्यादा वाढवण्यात यावी यासाठी निवडणूक आयोगाने रिझव्‍‌र्ह बँकेकडे (RBI) विनंती केली होती. मात्र RBIने निवडणूक आयोगाची विनंती नाकारली आहे.

याबाबत आता आयोगाने बँकेचे गव्हर्नर ऊर्जित पटेल यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली असून योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे. सध्या दिवसाला 10 हजार रुपये आणि दर आठवड्याला जास्तीत जास्त 24 हजार रुपये काढण्याची मुभा आहे. निवडणूक आयोगाने आरबीआयच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

ही मर्यादा उमेदवारांसाठी वाढवून देण्याबाबत आयोगाने विनंती केली होती. उमेदवारांना निवडणुकीचा खर्च इतक्या कमी रुपयात शक्य नसल्याने 24 हजारांवरून दोन लाख रुपये करण्याचे आरबीआयला सांगितले होते. मात्र दोन लाख रुपये काढण्याची परवानगी आता देणे शक्य नसल्याचे मध्यवर्ती बॅंकेने सांगितले.

Web Title: rbi refuses to increase withdrawal limit in poll bound states