देना बँकेवर रिझर्व्ह बॅंकेचे निर्बंध

वृत्तसंस्था
सोमवार, 14 मे 2018

मुंबई - बुडीत कर्जांचा डोंगर आणि तोटा झाल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने देना बॅंकेवर नव्याने कर्ज वितरण करण्यास निर्बंध लादले आहेत. रिझर्व्ह बॅंकेने देना बॅंकेवर ‘प्रॉम्प्ट करेक्‍टिव्ह ॲक्‍शन’ घेतली असून, यापुढे बॅंकेला कर्ज वितरण आणि नोकरभरती करता येणार नाही. 

सहा महिन्यांपासून देना बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक अणि मुख्य कार्यकारी अधिकारी पद रिक्‍त आहे. बॅंकेला ३१ मार्च रोजी संपलेल्या तिमाहीत १ हजार २२५ कोटींचा तोटा झाला. सलग तिसऱ्या तिमाहीत बुडीत कर्जांत आणि तोट्यात वाढ नोंदवण्यात आली. देना बॅंकेने कॉर्पोरेटमध्ये कर्जे दिलेली आहेत. मात्र, अनेक कर्ज खाती बुडीत कर्जांमध्ये परावर्तित झाल्याने बॅंकेला भरीव तरतूद करावी लागली. बॅंकेला नोकरभरती करण्यास बंदी घालण्यात आली आहे. बॅंकेतील महत्त्वाची पदे रिक्‍त आहेत. कर्जवसुलीसाठी देना बॅंकेने कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. ग्राहकांना त्यांच्या ठेवींबाबत केंद्र सरकारने आश्‍वस्त करावे, अशी मागणी ऑल इंडिया बॅंक एम्प्लॉइज असोसिएशनने  केली आहे.

Web Title: RBI restrictions on Dena Bank