मोदी सरकार-आरबीआयमध्ये पुन्हा तणाव; सरकारची दोन लाख कोटींची मागणी? 

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली: केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक यांच्यातील तणाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण ठरणार आहे रिझर्व्ह बँकेकडील अतिरिक्त रोकड. रिझर्व्ह बँकेकडे असेलली एक ते तीन लाख कोटी रुपये ही अतिरिक्त रोकड केंद्र सरकारला दिली जाण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेकडून तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अतिरिक्त रोकड म्हणजेच राखीव निधीतून सरकारला किती निधी देता येईल याबाबत अभ्यास करणार आहे.  

‘बँक ऑफ अमेरिका मॅरिल लिंच’च्या  एका अंदाजानुसार रिझर्व्ह बँकेकडून मोदी सरकारला एक ते तीन लाख कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. ही रक्कम जीडीपीच्या ०.५ ते १.६ टक्के आहे. काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी निधी उपलब्ध व्हावा यासाठी सरकारकडून बँकेवर दवाब आणला जात असल्याचे देखील बोलले जात आहे. नुकतेच केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सरकारला रिझर्व्ह बँकेच्या पैशांची गरज नसल्याचे बोललो होते.

 सध्या रिझर्व्ह बँकेकडे ९.५९ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोकड त्यातील ३.५ लाख कोटी रुपयांची मागणी सरकारने केल्याचे वृत्त होते. त्यांनतर मात्र केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेतील संबंध ताणले गेले होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RBI Sitting On ‘Excess Capital’, Can Easily Transfer Over Rs 1 Lakh Crore To Government