आरबीआयकडून दोन हजारांच्या नोटांची छपाई बंद

वृत्तसंस्था
सोमवार, 7 मे 2018

देशातील चलन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने ५०० रुपयांच्या नोटांच्या छपाईवर भर दिला आहे, तर सध्या २००० रुपयांच्या नोटेची छपाई थांबविण्यात आली आहे. अशी माहिती आर्थिक व्यवहार खात्याचे सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी दिली.

देशात दैनंदिन व्यवहारामध्ये ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटांनी व्यवहार करणं सोयीस्कर आहे. दोन हजार रुपयांच्या नोटांमध्ये छोटे व्यवहार करण्यात अडचणी येतात. त्यामुळे ५००, २०० आणि १०० रुपयांच्या नोटा उपलब्ध करून देण्यासाठी सध्या दोन हजार रुपयांच्या नोटेची छपाई थांबविण्यात आली आहे. अतिरिक्त रकमेची मागणी पूर्ण करण्यासाठी पाचशे रुपयांच्या चलनातील नोटांची छपाई दररोज तीन हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे सुभाषचंद्र गर्ग यांनी नमूद केले. देशामध्ये नोटा पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून, अतिरिक्त मागणीही पूर्ण केली जात आहे. गेल्या आठवड्यात देशातील चलन पुरवठ्याचा आढावा घेण्यात आला. देशातील ८५ टक्के एटीएम सुरळीत असल्याचे दिसून आले आहे. एकूणच परिस्थिती पूर्वपदावर आली आहे, असंही गर्ग यांनी नमूद केलं.

Web Title: RBI stops printing Rs 2000 notes, focus turns to Rs 200 notes