निकालांच्या घोषणेनंतर ‘आरबीएल बँके’चा शेअर 7 टक्के तेजीत

वृत्तसंस्था
सोमवार, 23 जानेवारी 2017

मुंबई: आरबीएल बँकेचा शेअर निकालांच्या घोषणेनंतर आज(सोमवार) इंट्राडे व्यवहारात तब्बल 7 टक्क्यांनी वधारला आहे. बँकेला डिसेंबरअखेर संपलेल्या तिमाहीत 128.7 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कर्जवाटपात मजबूत वाढ झाल्याने बँकेच्या नफ्यात तब्बल 59 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. बँकेने शुक्रवारी शेअर बाजार बंद झाल्यानंतर तिमाही निकालांची घोषणा केली होती. परिणामी, आज बँकेच्या शेअरमध्ये तेजी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

सरलेल्या तिमाहीत बँकेचे निव्वळ व्याजापोटी मिळणारे उत्पन्न 45 टक्क्यांनी वाढून 321.6 कोटी रुपयांवर पोचले आहे. याशिवाय, इतर उत्पन्न 66 टक्के वाढीसह 182.26 कोटी रुपयांवर पोचले आहे. अशाप्रकारे, बँकेचे एकुण उत्पन्न 52 टक्क्यांनी वाढून 503.84 कोटी रुपयांवर पोचले आहे.

यंदा बँकेच्या पतदर्जातदेखील सुधारणा झाली आहे. सरलेल्या तिमाहीत आरबीएल बँकेच्या एकुण(ग्रॉस) बुडित कर्जाचे प्रमाण 1.08 टक्क्यावरुन 1.06 टक्क्यावर पोचले आहे. याशिवाय, निव्वळ(नेट) बुडित कर्जाचे प्रमाण 0.69 टक्क्यावरुन 0.52 टक्क्यावर पोचले आहे.

मुंबई शेअर बाजारात आरबीएल बँकेचा शेअर आज(सोमवार) 383.90 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 380.25 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 393.40 रुपयांवर दिवसभराची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(12 वाजून 55 मिनिटे) 386.50 रुपयांवर व्यवहार करत असून 4.93 टक्क्यांनी वधारला आहे.

Web Title: RBL bank share up now after result