तीन हजार अब्ज रुपयांचे तारण 'थकीत' 

वृत्तसंस्था
बुधवार, 19 ऑक्टोबर 2016

नवी दिल्ली :  भारतातील रिअल इस्टेटमधील मालमत्ता थकीत कर्जांमध्ये अडकली असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. थकीत कर्जांच्या तारणामध्ये अडकलेली रिअल इस्टेटमधील मालमत्ता 3 हजार अब्ज रुपयांच्या घरात असल्याचे भारतातील एका प्रमुख रिअल्टी क्षेत्रातील सल्लागार संस्थेचे म्हणणे आहे. 

'एचडीएफसी रिअल्टी' या सल्लागार संस्थेने थकीत कर्ज वसूल करण्यासाठी रिअल इस्टेटमधील मालमत्ता भारतातील तीन बड्या बॅंकांकडे ठेवली असल्याचे एचडीएफसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम गोयल यांनी सांगितले.

गोयल यांनी थकीत कर्जधारकांची नावे सांगण्यास नकार दिला; तसेच कर्जांची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगितले. मार्चअखेरपर्यंत देशभरातील बॅंक थकीत कर्जांच्या वसुलीसाठी मोठे पाऊल उचलण्याच्या विचारात आहेत.

गेल्या सतरा वर्षांपासून थकीत कर्जांच्या वसुलीसाठी कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.

Web Title: Real Estate NPA is highest