वाहन विक्रीत मंदीचा स्पीडब्रेकर!

वाहन विक्रीत मंदीचा स्पीडब्रेकर!

मुंबई: सहा महिन्यांपासून मंदीशी झगडणाऱ्या वाहन उद्योगाची अवस्था जुलैमध्ये आणखी बिकट झाली आहे. जुलै महिन्यात १२ पैकी ११ कंपन्यांच्या वाहन विक्रीत घसरण नोंदवण्यात आली. सातत्याने वाहन विक्रीत घट होत असल्याने वाहन उत्पादक, वितरक, सुटे भाग निर्मात्यांची चिंतेत भर पडली आहे.

देशातील सर्वांत मोठी वाहन उत्पादक असलेल्या मारुती सुझुकीच्या विक्रीत ३६.८ टक्‍क्‍यांची घसरण झाली. मारुतीने जुलैमध्ये ९६ हजार ४०० मोटारींची विक्री केली. जुलै २०१८ मध्ये कंपनीने एक लाख ५२ हजार ४२७ मोटारींची विक्री केली होती. त्याशिवाय टाटा मोटर्सच्या विक्रीत ३८.६ टक्के घसरण झाली. होंडाच्या विक्रीत ४८ टक्के, रेनॉच्या विक्रीत ४१ टक्के, निसानच्या विक्रीत ५३ टक्के, फोर्डच्या विक्रीत १९ टक्के, स्कोडाच्या विक्रीत १४ टक्के, फियाटच्या विक्रीत ५८ टक्के आणि टोयोटाच्या विक्रीत २३ टक्के घट झाली आहे. त्याशिवाय ह्युंडाय आणि महिंद्रा या कंपन्यांनी वाहनविक्रीत अनुक्रमे १० टक्के आणि ६.५ टक्के घट झाल्याचे म्हटले आहे. फोक्‍सवॅगनच्या मोटार विक्रीत मात्र किंचित वाढ झाली. कंपनीने दोन हजार ५०० मोटारींची विक्री केली. गेल्या वर्षी याच महिन्यात फोक्‍सवॅगनने दोन हजार ४६६ मोटारींची विक्री केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com