‘पीएसपी प्रोजेक्ट्स’च्या शेअरची 199 रुपयांवर नोंदणी

वृत्तसंस्था
सोमवार, 29 मे 2017

मुंबई: अहमदाबाद येथील बांधकाम कंपनी पीएसपी प्रोजेक्ट्सच्या शेअरची आज(सोमवार) मुंबई शेअर बाजारात अवघ्या 199 रुपयांवर नोंदणी झाली आहे. कंपनीने निश्चित केलेल्या 210 रुपयांच्या इश्यू प्राइसपेक्षा ही किंमत 5.24 टक्क्यांनी कमी आहे.

याच महिन्यात 17 ते 19 मेदरम्यान पार पडलेल्या कंपनीच्या प्रारंभिक समभाग विक्रीला(इनिशिअल पब्लिक ऑफरिंग-आयपीओ) गुंतवणूकदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. अखेरच्या दिवशी कंपनीचा आयपीओ 1.30 पट अधिक सबस्क्राइब्ड झाला. प्रस्तावित योजनेत पीएसपी प्रोजेक्ट्सचे 72 लाख नवे तसेच ऑफर फॉर सेलमार्फत 28.8 लाख इक्विटी शेअर्स विक्रीसाठी उपलब्ध होते. आयपीओ खरेदीसाठी प्रतिशेअर 205 ते 210 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित झाला होता. कंपनीने या योजनेतून 211 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचे ठरविले होते. यातून मिळालेल्या भांडवलातून दीर्घकालीन तसेच खेळत्या भांडवलाची तरतूद करण्यात येणार आहे.

नोंदणीनंतर काही वेळातच कंपनीच्या शेअरने 189.05 रुपयांवर 52 आठवड्यांची नीचांकी पातळी गाठली. सध्या(11 वाजून 20 मिनिटे) मुंबई शेअर बाजारात कंपनीचा शेअर 208.95 रुपयांवर व्यवहार करत असून 1.05 रुपये अर्थात 0.50 टक्क्याने घसरला आहे. या शेअरच्या भावानुसार कंपनीचे 752.22 कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.

Web Title: Register of 'PSP Projects' at Rs 199