भारतात मंदीचा प्रभाव तात्पुरता : मुकेश अंबानी

वृत्तसंस्था
बुधवार, 30 ऑक्टोबर 2019

भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले आहे. मात्र, हा तात्पुरता परिणाम आहे, असे अंबानी यांनी सांगितले. ते म्हणाले, की ऑगस्टपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या सुधारणांचे सुपरिणाम आगामी तिमाहींमध्ये दिसून येतील. एप्रिल ते जून या तिमाहीत विकासदर 5 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे.

रियाध : मंदीचा प्रभाव तात्पुरत्या स्वरूपाचा असून, केंद्र सरकारने हाती घेतलेल्या सुधारणांमुळे येत्या तिमाहीमध्ये अर्थव्यवस्था पूर्वपदावर येईल, असा विश्‍वास रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. सौदी अरेबियातील वार्षिक गुंतवणूक परिषदेत ते बोलत होते.

भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीने ग्रासले आहे. मात्र, हा तात्पुरता परिणाम आहे, असे अंबानी यांनी सांगितले. ते म्हणाले, की ऑगस्टपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतलेल्या सुधारणांचे सुपरिणाम आगामी तिमाहींमध्ये दिसून येतील. एप्रिल ते जून या तिमाहीत विकासदर 5 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला आहे. 2013 नंतर सर्वांत कमी विकासदर आहे. गुंतवणुकीला ओहोटी, वस्तूंचा खप कमी होणे, बेरोजगारी आणि वित्तीय संकटांचा परिणाम वृद्धिदरावर झाला आहे. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये मोदी सरकारने विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी सुधारणांवर भर दिला असल्याचे अंबानी यांनी सांगितले.

त्याचे चांगले परिणाम नजीकच्या काळात दिसून येतील. भारत आणि सौदी अरेबियामध्ये परस्पर व्यावसायिक संबध वृद्धिगंत होत आहेत. दोन्ही देशांना नवतंत्रज्ञान, तरुणाई आणि कुशल नेतृत्व लाभले असल्याचे अंबानी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Reliance chairman Mukesh Ambani talked about recession in India