रिलायन्स डिफेन्सला सरकारकडून 916 कोटींचे कंत्राट

वृत्तसंस्था
सोमवार, 30 जानेवारी 2017

मुंबई: संरक्षण मंत्रालयाकडून ‘रिलायन्स डिफेन्स अँड इंजिनिअरिंग'ला 916 कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. या कंत्राटाअंतर्गत भारतीय तटरक्षक दलासाठी 14 'फास्ट पेट्रोल वेसल्स' तयार करण्यात येणार आहेत. भारतीय सशस्त्र दलाचे एवढे मोठे कंत्राट ‘रिलायन्स डिफेन्स'च्या रुपाने प्रथमच खाजगी क्षेत्रातील कंपनीला मिळाले आहे.

रिलायन्स डिफेन्स ही पूर्णपणे रिलायन्स इनफ्रास्ट्रक्चरच्या मालकीची उपकंपनी आहे. ‘रिलायन्स डिफेन्स'ने संरक्षण मंत्रालयाच्या या कंत्राटासाठीच्या लिलावात सहभाग घेतला होता. एल अँड टी, कोचीन शिपयार्ड लिमिटेड, गोवा शिपयार्ड लिमिटेड आणि गार्डन शिपबिल्डर्स आणि इंजिनीअर लिमिटेड या कंपन्यांनीदेखील या कंत्राटासाठी बोली लावली होती. मात्र अखेर ‘रिलायन्स डिफेन्स'ला कंत्राट मिळविण्यात यश आले आहे.

सध्या मुंबई शेअर बाजारात ‘रिलायन्स डिफेन्स अँड इंजिनिअरिंग'चा शेअर 61.75 रुपयांवर व्यवहार करत 4.50 रुपयांनी म्हणजे 7.86 टक्क्यांनी वधारून बंद झाला. शेअरने आज (सोमवार) इंट्रा-डे व्यवहारात 63 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. दहा रुपये दर्शनी किंमत असणार्‍या शेअरने वर्षभरात 48.40 रुपयांची नीचांकी, तर 114 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली.

Web Title: Reliance Defence bags Rs 916 crore contract from Indian Coast Guard