रिलायन्स डिफेन्स अमेरिकी नौदलासोबत करारबद्ध

वृत्तसंस्था
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

नवी दिल्ली: अनिल अंबानी यांच्या 'रिलायन डिफेन्स'ला अमेरिकी नौदलाच्या युद्धनौकांच्या दुरुस्ती सेवांचे कंत्राट मिळाले आहे. प्रामुख्याने पश्चिमी प्रशांत महासागर आणि हिंदी महासागरात कार्यरत असणाऱ्या 'सेवन्थ फ्लीट'च्या नौकांसाठी कंपनीतर्फे दुरुस्ती आणि बदल सेवा पुरविल्या जातील.

भारताच्यादृष्टीने हे अत्यंत महत्त्वपूर्ण कंत्राट आहे. देशातील बंदरांवर पहिल्यांदाच अमेरिकी नौदलाला सेवा पुरविण्याचा मान रिलायन्स समुहाला मिळाला आहे.

अमेरिकेच्या या फ्लीटकडून सुमारे 5,070 जहाजे आणि पाणबुड्या, 140 विमाने आणि 20,000 खलाशांचे नेतृत्व केले जाते. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे मालकी असणाऱ्या रिलायन्स डिफेन्सने अमेरिकी नौदलासोबत 'मास्टर शिप रिपेअर अॅग्रीमेंट'(एमएसआरए) वर सह्या केल्याचे सांगितले. या कंत्राटाची एकुण किंमत तब्बल 15,000 कोटी रुपये असल्याचा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे.

गुजरातमधील पिपावाव येथील रिलायन्स शिपयार्डला गेल्या महिन्यात अमेरिकी नौदलासाठी दुरुस्ती आणि फेरफार सेवांचा कंत्राटदार म्हणून मंजुरी मिळाली आहे.

Web Title: Reliance Defence to undertake repair and maintenance for US Navy