रिलायन्स इंडस्ट्रीजचा नवा उच्चांक; गुंतवणूकदार मालामाल

पीटीआय
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

शेअरने आज प्रथमच 900 रुपयांची पातळी ओलांडली. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये रोजच वाढ होत असल्याने 2017 मध्ये शेअर 68 टक्क्यांनी वधारला आहे. गुंतवणूकदारांनी मालमत्ता 2017 मध्ये 2.4 कोटी रुपयांनी वधारली.

मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर रोजच नवीन उच्चांक गाठतो आहे. शेअरने आज (बुधवार) इंट्राडे व्यवहारात 917 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. ही शेअरची वर्षभरातील उच्चांकी पातळी आहे. शेअरने आज प्रथमच 900 रुपयांची पातळी ओलांडली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये रोजच वाढ होत असल्याने 2017 मध्ये शेअर 68 टक्क्यांनी वधारला आहे. गुंतवणूकदारांनी मालमत्ता 2017 मध्ये 2.4 कोटी रुपयांनी वधारली आहे.

'जिओ'च्या दूरसंचार क्षेत्रातील प्रवेशानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सतत वाढ सुरूच आहे. शिवाय जिओच्या बाजारातील प्रवेशानंतर सहा महिन्यांच्या आत जिओने 10 कोटी मोबाइलग्राहकांचा टप्पा गाठला होता. सरलेल्या तिमाहीत तर कंपनीने 1.53 कोटी नवीन ग्राहक जोडले आहे. गेल्या आठवड्यात रिलायन्स इंडस्ट्रीजने सप्टेंबर अखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत 8 हजार 097 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. 'रिलायन्स जिओ'च्या चांगल्या कामगिरीमुळे पुढील तिमाहीत अधिक चांगले परिणाम बघायला मिळणार असल्याचे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सांगितले.

आज (बुधवार) रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 913.75 रुपयांवर व्यवहार करत 39.50 रुपयांनी म्हणजेच 4.52 टक्क्यांनी वधारून बंद झाला.

Web Title: Reliance Industries hits record high, up 5%