'रिलायन्स इंडस्ट्रीज'चा नफा रु.7,704 कोटींवर 

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजने आज (गुरुवार) 30 सप्टेंबरअखेर संपलेल्या दुसऱ्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत.

कंपनीच्या निव्वळ नफ्यात गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत 18 टक्के वाढ झाली आहे. कंपनीचा निव्वळ नफा रु.7,704 कोटींवर पोचला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने रु. 6,534 कोटींचा नफा नोंदवला होता. 

मात्र, कंपनीच्या उत्पनात किरकोळ वाढ झाली आहे. दुसऱ्या तिमाहीत उत्पन्न रु. 66,198 कोटींवरून रु. 66,624 कोटींवर पोचले आहे. जून ते सप्टेंबर या तिमाहीत कंपनीचे ग्रॉस रिफाइनिंग मार्जिन म्हणजेच जीआरएम 10.8 डॉलर प्रतिबॅरलवरून वाढून 10.10 डॉलर प्रतिबॅरल झाले आहे.

अखेर मुंबई शेअर बाजारात रिलायन्सचा शेअर 1088.50 रुपयांवर व्यवहार करत 1.60 रुपयांच्या किरकोळ घसरणीसह बंद झाला. सध्याच्या बाजारभावानुसार कंपनीचे बाजारभांडवल रु. 353,012.08 कोटींवर पोचले आहे. दहा रुपये दर्शनी किमतीच्या शेअरने वर्षभरात 888.50 रुपयांची नीचांकी, तर 1128.90 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. 

Web Title: Reliance Industries record profit in second Quarter