‘रिलायन्स इंडस्ट्रीज’चा शेअर 1300 रुपयांच्या पार

वृत्तसंस्था
सोमवार, 6 मार्च 2017

मुंबई: मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजवर(आरआयएल) गुंतवणूकदारांचा विश्वास दिवसेंदिवस आणखी मजबूत होताना दिसत आहे. परिणामी, आज(सोमवार) कंपनीच्या शेअरने 1300 रुपयांचा टप्पा पार करीत पुन्हा एकदा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.

एकीकडे समुहाच्या रिलायन्स जियोने दूरसंचार क्षेत्रात धुमाकूळ घातलेला असताना समुहाला ऊर्जा व्यवसायातूनदेखील चांगले उत्पन्न मिळू शकते असा पतमापन संस्थांचा विश्वास आहे. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष यांनी रिलायन्स जियोच्या इंटरनेट सेवांवर शुल्क आकारण्याची घोषणा केल्यापासून रिलायन्स इंडस्ट्रीच्या शेअरमध्ये तेजी कायम आहे. सीएलएसए या संस्थेने कंपनीची टार्गेट प्राइस 1,350 रुपयांवरुन 1,500 रुपयांवर नेली आहे. याशिवाय, संस्थेने शेअरसाठी 'बाय' असे मानांकन निश्चित केले आहे.

मुंबई शेअर बाजारात रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर आज(सोमवार) 1268 रुपयांवर उघडला. त्यानंतर, शेअरने 1265.45 रुपयांवर दिवसभराची नीचांकी तर 1309.90 रुपयांवर दिवसभराची तसेच 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी गाठली. सध्या(1 वाजून 6 मिनिटे) 1299.45 रुपयांवर व्यवहार करत असून 3.26 टक्क्यांनी वधारला आहे.

Web Title: reliance industry share 1300 price