रिलायन्स 'जिओ'चे हे आहेत 'न्यू इअर' प्लॅन!

वृत्तसंस्था
शनिवार, 6 जानेवारी 2018

रिलायन्स जिओने नव्या वर्षासाठी 'हॅप्पी न्यू इअर' प्लॅन आणला आहे. न्यू इअर प्लॅनअंतर्गत जिओच्या ग्राहकांना दोन प्रकारच्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. दररोज 1 जीबी डेटा वापरणाऱ्या सर्वच ग्राहकांसाठी या ऑफर्स देऊ केल्या आहेत.

नवी दिल्ली: रिलायन्स जिओने नव्या वर्षासाठी 'हॅप्पी न्यू इअर' प्लॅन आणला आहे. न्यू इअर प्लॅनअंतर्गत जिओच्या ग्राहकांना दोन प्रकारच्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत. दररोज 1 जीबी डेटा वापरणाऱ्या सर्वच ग्राहकांसाठी या ऑफर्स देऊ केल्या आहेत.

पहिली ऑफर: रिलायन्सच्या या नव्या ऑफर्सअंतर्गत ग्राहकाला एकतर दररोज 1 जीबी डेटा देणाऱ्या सर्वच पॅक्सना 50 रुपये वजा करून रिचार्ज करू शकणार आहेत.

दुसरी ऑफर: 1 जीबी देणाऱ्या जुन्या प्लॅनच्या किंमतीवरच दररोज 50 टक्के अधिकचा डेटा प्राप्त करू शकणार आहे. म्हणजेच कंपनीच्या एका ऑफरअंतर्गत ग्राहक आता   दररोज 1 जीबीच्या जागी 1.5 जीबी डेटा मिळवू शकणार आहे.

ग्राहकांना येत्या 9 जानेवारीपासून दोन्ही ऑफर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
1) जिओच्या पहिल्या ऑफरअंतर्गत 199 रुपयांचा 28 दिवसांची व्हॅलिडिटी आणि 28 जीबी डेटा देणारा प्लॅन आता फक्त 149 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
2) या ऑफरमध्ये 70 दिवसांची वैधता आणि 70 जीबी डेटा देणारे 399 रुपयांचे रिचार्ज फक्त 349 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
3) 459 रुपयांमध्ये 91 दिवसांची वैधता आणि 91 जीबी जेटा देणारा प्लान 449 रुपयांत उपलब्ध होणार आहे.
4) 198 रुपयांमध्ये 28 दिवसांची वैधता असलेल्या पॅकमध्ये 28 जीबीच्या जागी आता 50 टक्के अधिक म्हणजेच 42 जीबी डेटा मिळेल.
5) 398 रुपयांमध्ये 70 दिवसांची वैधता देणाऱ्या प्लॅनमध्ये 70 जीबीच्या जागी 105 जीबी डेटा ग्राहकाला मिळणार आहे.
6) 448 रुपयांमध्ये 84 दिवसांची वैधता असलेल्या प्लॅनमध्ये आता 84 जीबी डेटा न मिळता 126 जीबी डेटा मिळणार आहे.

Current price New price Validity Total data (1GB/day)
Rs. 199 Rs. 149 28 days 28GB
Rs. 399 Rs. 349 70 days 70GB
Rs. 459 Rs. 399 84 days 84GB
Rs. 499 Rs. 449 91 days 91GB

 

Price Validity Total data (1GB/day)
Rs. 198 28 days 42GB
Rs. 398 70 days 105GB
Rs. 448 84 days 126GB
Rs. 498 91 days 136GB
Web Title: Reliance Jio ‘Happy New Year 2018’