जिओ फोननंतर अंबानी आणताय आता...

वृत्तसंस्था
शनिवार, 14 एप्रिल 2018

मुंबई: रिलायन्स जिओच्या 4 जी व्हीओएलटीई तंत्रज्ञानामुळे भारतीय दूरसंचार क्षेत्रात 'धमाल' उडवून दिली आहे. शिवाय जिओच्या 1500 रुपयांच्या फीचर फोनने बाजारात प्रवेश केल्यापासून मोबाईल कंपन्यांचे सर्व गणितच बदलून टाकले आहे. आता लवकरच मुकेश अंबानी आपल्या ग्राहकांसाठी सिम कार्ड असलेला लॅपटॉप आणण्याच्या तयारीत आहेत. 

रिलायन्स जिओने अमेरिकी चिप निर्माता कंपनी 'क्वालकॉम'सोबत बोलणी सुरु केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे लॅपटॉप विंडोज 10 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतील. खास भारतीयांसाठी हे लॅपटॉप डिझाईन केले जाणार असून 'बिल्ट-इन सेल्युलर कनेक्शन'सह लॅपटॉप सादर केले जाण्याची शक्यता आहे. क्वालकॉम कंपनी या आधीपासून जिओच्या 4 जी फीचर फोनसाठी रिलायन्स जिओ आणि रिलायन्स रिटेलसाठी काम करते आहे. काउंटरपॉईच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी 50 लाख लॅपटॉप विकले जातात. 

क्वालकॉम टेक्नोलॉजीजचे प्रॉडक्ट मॅनेजमेंटचे वरिष्ठ संचालक मिगेल नूयेस एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हणाले की,''आमची जिओसोबत चर्चा सुरु असून आयओटी तंत्रनाज्ञाचा देखील यात वापर केला जाणार आहे.'' मात्र जिओकडून यासंबंधित कोणत्याही वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. 

Web Title: Reliance Jio and Qualcomm are working on a 4G-enabled laptop for India