जिओ ग्राहकांसाठी घेणार 'डिजीटल उडान'

जिओ ग्राहकांसाठी घेणार 'डिजीटल उडान'

मुंबई: जिओने आता इंटरनेट साक्षरतेवर भर देत ग्राहकांसाठी ‘डिजीटल उडान’ या नवीन मोहिमेला सुरुवात केली आहे. रिलायन्स जिओने फेसबुकबरोबर ही मोहीम हाती घेतली असून आता ग्राहकांना प्रत्येक शनिवारी सुरक्षित इंटरनेट कसे वापरायचे याचे प्रशिक्षण देणार आहे. यामध्ये  जिओ फोनचे फीचर्स, विविध अॅप्सचा वापर कसा करावा याबाबत देखील माहिती दिली जाईल. 

दूरसंचार क्षेत्रात जिओने पाऊल ठेवल्यापासून इतर दूरसंचार कंपन्यांचे ग्राहक देखील जिओकडे आले आहेत. शिवाय जिओने डेटादर युद्ध सुरु केल्याने कंपन्यांचे शुल्क कमी झाले आहे. परिणामी भारतातील डेटा वापर वाढला असून दिवसेंदिवस स्मार्टफोनचे युजर्स आणि इंटरनेटचा वापर वाढतो आहे. मात्र अजूनही ग्रामीण भागात किंवा पहिल्यांदाच इंटरनेटचा वापर करण्यासाठी अनेक अडचणी येतात. स्थानिक भाषांमध्ये माहिती उपलब्ध होत नसल्याने 
वापरकर्त्यांना अडचणी येतात. 

डिजिटल उडाण उपक्रमाचा एक भाग म्हणून,जिओफोनच्या तसेच विविध अँप्सचा वापर ,जिओफोनवर फेसबुकचा वापर करून मित्रांशी कनेक्टेड राहणे आणि साध्या, सुरक्षित आणि सोप्या पद्धतीने इंटरनेट हाताळण्यासाठी प्रत्येक शनिवारी जिओ युजर्स माहिती देणार आहे. 10 प्रादेशिक भाषांमध्ये ऑडिओ व्हिज्युअल प्रशिक्षण माध्यमातून माहिती दिली जाईल. डिजिटल स्पेससाठी विकसित केलेले मॉड्यूल हे जिओ आणि फेसबुक ग्राहकांना उपयोगी ठरणार आहे आणि ट्रेन-द-ट्रेनर सत्र आणि व्हिडिओ आणि माहिती ब्रोशर प्रशिक्षण देण्यासाठी फेसबुक सहकार्य करणार आहे. सुरुवातीला हा कार्यक्रम 13 राज्यांमध्ये सुमारे 200 वेगवेगळ्या ठिकाणी लॉन्च केला जात आहे. 

रिलायन्स जिओचे संचालक आकाश अंबानी म्हणाले, "जिओ नेहमीच महत्त्वाच्या जागतिक भागीदारांसोबत काम करण्यास उत्सुक आहे. ‘डिजीटल उडान’   हा उपक्रम त्याचाच एक उदाहरण आहे. ज्यामुळे इंटरनेट साक्षरतेवर भर देण्यात येणार आहे. कोणत्याच भारतीयाला आता शिक्षण आणि मनोरंजनापासून वंचित राहावे लागणार नाही. जिओने भारतातील प्रत्येक गावागावात जाऊन 100 टक्के डिजिटल साक्षरता साध्य करण्याचे ठरविले आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com